ऑस्कर विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन कीरावाणींना सन्मानित करण्यात आलं. ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या ऑस्करला गेल्यापासूनच याचे संगीत दिग्दर्शक एमएम कीरावनी चर्चेत आहेत. पण तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता कि जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार जिंकणाऱ्या कीरावनी यांनी जगातील सगळ्याच पुरस्कार समारंभावर बहिष्कार घालण्याची शपथच घेतली होती.

२०१३ च्या एका इवेंटमध्ये एमएम कीरावनी यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. एका प्रसिद्ध मासिकाच्या पुरस्कारांच्या यादीत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आरडी बर्मन यांना एकही पुरस्कार मिळाला नसल्याचं जेव्हा किरवानी यांच्या ध्यानात आलं तेव्हा त्यांनी या पुरस्कार समारंभावर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली होती, इतकंच नव्हे तर त्यांनी स्वतःला मिळालेला पुरस्कारही नाकारला होता. आरडी बर्मन यांनी इतकं उत्कृष्ट काम करूनही त्यांच्या पश्चात त्यांना सांत्वनपर एक पुरस्कार देणं हे कीरावनी यांनी चांगलंच खटकलं होतं, यामुळेच त्यांनी पुरस्काराला बॉयकॉट करायचं ठरवलं होतं.

Han Kang The Nobel Prize in Literature 2024
Who is Han Kang : मानवी जीवनातील नाजूकपणा मांडणाऱ्या लेखिकेचा सर्वोच्च पुरस्कार, दक्षिण कोरियात साहित्यातील पहिला नोबेल मिळवणाऱ्या हान कांग कोण?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Mithun Chakraborty, Dadasaheb Phalke Award,
डिस्को डान्सर…
Mithun Chakraborty in Disco Dancer. (Express Archive Photo)
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; जिमीने बॉलिवूडमध्ये डिस्कोची लाट कशी आणली?
rajbhasha kirti puraskar to rajbhasha kirti puraskar
महाबँकेला राजभाषेचा सर्वोच्च ‘कीर्ती पुरस्कार’
cosmos bank get best cooperative bank award
कॉसमॉस बँकेला सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार
Dadasaheb Phalke Award
Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके पुरस्काराची परंपरा कधी सुरु झाली? काय असतं पुरस्काराचं स्वरुप? कोण कोण आहेत मानकरी?
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award News in Marathi
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

आणखी वाचा : अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का? अभिनेत्रीच्या आईचा मोठा खुलासा

२०१३ च्या इवेंटमध्ये एसपी बालसुब्रमण्यम यांच्याशी बोलताना कीरावनी यांनी तो संपूर्ण प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “२००० साली फिल्मफेअर या मासिकाने त्यांच्या खास एडिशनमध्ये आजवर नामांकन मिळालेले आणि पुरस्कार जिंकलेल्या लोकांची यादी प्रकाशित केली होती. मी खूप उत्सुकतेने ते मासिक विकत घेतलं आणि मला खूप मोठा धक्काच बसला. त्यावेळी प्रथम मला समजलं की आरडी बर्मन यांना एकही पुरस्कार मिळालेला नव्हता. माझ्यामते हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात आरडी बर्मन इतका श्रेष्ठ आणि हरहुन्नरी संगीतकार झालेला नाही.”

आणखी वाचा : “ही वडील आणि मुलाबरोबर…” अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यावर सेलिना जेटली संतापली, म्हणाली…

प्रामुख्याने तेलुगू चित्रपटसृष्टीत काम करूनही कीरावनी हे आरडी बर्मन यांचे खूप मोठे चाहते होते. पुढे ते म्हणाले, “मी दोनवेळा ते मासिक चाळलं, पण त्यात मला आरडी बर्मन यांचं नाव मिळालं नाही. त्यांच्या पश्चात त्यांना फक्त एक सांत्वनपर पुरस्कार देण्यात आल्याचं मला दिसलं. त्यानंतर मी या पुरस्कार समारंभांना महत्त्व द्यायचं बंद केलं. फक्त फिल्मफेअरच नाही तर मी सगळ्या पुरस्कारांवर बहिष्कार घालायचं ठरवलं आणि त्या सोहळ्यामध्ये सहभाग घेणंसुद्धा टाळलं.”

एम एम कीरावनी तेलुगु चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आहेत. साहाय्यक संगीतकार म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘मनासु ममता’ या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. किरावनी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार नावावर केले आहेत. नाटू नाटू’ साठीच त्यांना गोल्डन ग्लोब्सचा अवॉर्डही मिळाला. ‘मगधीरा’ व ‘बाहुबली २’ या चित्रपटातील गाण्यांसाठीही त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.