बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. आता प्रियांकाचा आणखी एक किस्सा समोर आला आहे. २०१४ मध्ये प्रियांकाने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शो मध्ये हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकाने सांगितले होते की तिला एका लेस्बियन महिलेने प्रपोज केले होते. त्यावेळी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रियांकाने एक शक्कल लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कॉफी विथ करण’च्या त्या भागात प्रियांकासोबत बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणने हजेरी लावली होती. त्यावेळी करणने प्रश्न विचारला की “एखाद्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तू दुसर्‍या कोणालातरी डेट करत आहे असे कधी सांगितले का?” या प्रश्नावर प्रियांकाने तिचा अनुभव सांगितला. “काही वर्षांपूर्वी मी एका नाइट क्लबमध्ये होते. तिथे एक महिला होती, तिला माझ्या बद्दल माहित नव्हते की ती जो विचार करते तशी मी नाही, आणि माझं लक्ष तिच्याकडे वेधण्यासाठी ती खूप प्रयत्न करत होती,” असं प्रियांका म्हणाली.

करण देखील त्या महिलेला ओळखतो म्हणत प्रियांका पुढे म्हणाली, “मी तिला फक्त सांगितले की बेब, माझा बॉयफ्रेन्ड आहे, मात्र त्यावेळी माझा बॉयफ्रेन्ड नव्हता. मला मुलांना डेट करायला आवडतं असं मला तिला सांगायचं होतं.”

‘द व्हाइट टायगर’ हा प्रियांकाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियांकासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता राजकुमार राव आणि आदर्श गौरव होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिची स्तुती करण्यात आली होती.

आणखी वाचा : मलायकाला भररस्त्यात रोखणारे आजोबा झाले ट्रोल

प्रियांका सध्या लंडनमध्ये असून रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ सीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘सिटाडेल’मध्ये ती हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडनसोबत दिसणार आहे. प्रियंका गेल्या वर्षी ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When priyanka chopra opened up about her lesbian encounter she was very flirtatious somebody i knew dcp