बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा, करोनाकाळानंतर ती ३ वर्षानंतर मायदेशात परतली आहे. प्रियांका चोप्रा यावेळी भारतात एकटी येत नाहीये तर तिच्याबरोबर तिची लाडकी लेक मालतीही भारतात आली आहे. मुंबईला आल्यानंतर ती दररोज कुठे-ना-कुठे फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर ला तिने भेट दिली आहे.

प्रियांकाच्या चित्रपटांची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा तिच्या खासगी आयुष्याबद्दल होताना दिसून येते. तिने निक जोनसबरोबर लग्नगाठ बांधली. दोघांनी भारतीय पद्धतीने लग्न केले. काही महिन्यांपूर्वीच प्रियांकाने सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म दिला. प्रियांका आणि निकची चर्चा कायम होत असते.दोघे एकमेकांवर प्रेम करतात. मात्र प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले होते की “जर तिच्या नवऱ्याने तर ती काय करणारे ते, बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या दरम्यान फिल्मफेअरला मुलखात देताना या प्रश्नाचे तिने उत्तर दिले की जर माझा नवरा दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडला तर मी बाय-बाय म्हणेन. माझा असा विश्वास आहे की माणसं नात्यात तेव्हाच असावीत जेव्हा त्यात प्रेम असेल. एकमेकांबद्दल आदर ठेवा. पण आदरापूर्वी प्रेम आणि सहवास हवा. जर तुमच्या जोडीदाराला या गोष्टी दुसऱ्या कोणामध्ये आढळल्या असतील तर त्याला धरून राहून काय उपयोग?”

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

दीपिका-रणवीरचा व्हेकेशन मोड; दोघांचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल

ती पुढे म्हणाली “नवऱ्याने फसवणूक केली तर पत्नीने त्याला मारावे तुमचा विवाह वाचवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. पण जेव्हा त्याचे मन तुमच्यासोबत नसते तेव्हा नाही. मग ना तू सुखी होणार ना तो सुखी. मग काय उपयोग? स्वतःला अशा परिस्थितीत का ठेवायचे? स्वाभिमान खूप महत्वाचा आहे. माझ्या नवऱ्याने जर असे केले तर नक्की मी त्याला खूप मारेन, मी माणूस आहे पण मी हिंसक होऊ शकते.”

दरम्यान प्रियांका चोप्रा काही वर्षे अमेरिकेत राहिली आहे. भारतात शिक्षण झाल्यानंतर १२ व्या वर्षी प्रियांका अमेरिकेत गेली होती. मात्र काही वर्षांनी ती पुन्हा भारतात परतली आणि बॉलिवूडमध्ये आपलं करिअर उभं केलं. भारतीय चित्रपटसृष्टीत चांगलं नाव कमावल्यानंतर तिने २०१५ मध्ये ‘क्वांटिको’मधून तिने हॉलिवूड पदार्पण केलं आहे.

Story img Loader