बॉलिवूडमध्ये पडद्यावर आणि पडद्यामागे अनेक गोष्टी घडत असतात. यातील अनेक गोष्टी या मजेशीर असतात. अनेकदा कलाकार त्यांच्या कॅमेरामागे घडलेले भन्नाट किस्से सांगताना दिसतात. नुकतंच अभिनेत्री सिमी गरेवालने एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचा एक किस्सा सांगताना दिसत आहे.

सिमी गरेवालने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या एक टॉक शोमधील आहे. यात प्रियांका चोप्राने एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. या चित्रपटात अभिषेक बच्चनही स्क्रीन शेअर केली होती. या व्हिडीओच्या सुरुवातीला सिमीने प्रियांकाला अभिषेक बच्चनचा एक किस्सा सांगितना दिसत आहे.

यावेळी सिमी ही प्रियांकाला तू शूटींगदरम्यान अभिषेकचा मोबाईल चोरला होतास का? असा प्रश्न विचारते. यावर प्रियांका हसते आणि म्हणते, अभिषेकने आधी माझा फोन चोरी केला होता. त्यावर तो बसला. पण त्यानंतर योगायोगाने त्याला काहीतरी काम आठवले आणि त्याला फोनवरुन उठावे लागले. त्यानंतर मी त्याचा फोन चोरला आणि लपवून ठेवला.

यावर सिमी म्हणते की, तू फक्त फोन चोरला होतास की कोणाला मेसेजही पाठवला होता. यावर प्रियांका म्हणते, “मी त्यांच्या फोनवरून राणी मुखर्जीला मेसेज केला होता. त्यात मी असे लिहिले होते की, मला तुझी आठवण येत आहे, तू कुठे आहेस? तू पाहिजे…आणि यानंतर ती हसायला लागते. विशेष म्हणजे यावर राणीनेही अभिषेक बच्चनला रिप्लाय दिला होता. त्यावर ती म्हणाली होती, हाय AB, तुला काय झाले आहे?

दरम्यान या व्हिडीओच्या शेवटी प्रियांका सिम्मीला विचारते की, तुला हा किस्सा कसा समजला? त्यावर सिमी म्हणते “मी खूप लोकांना ओळखते. आम्ही आमचा सोर्स उघड करू शकत नाही. त्यानंतर शेवटी प्रियांका म्हणते, “मला खात्री आहे की तो अभिषेकच असेल.”

प्रियांका आणि निकच्या बाळाचे नाव काय ठेवले? आई मधू चोप्रांनी केला खुलासा

प्रियांका चोप्राने अभिषेक बच्चनसोबत ‘ब्लफमास्टर’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. तर अभिषेकने राणीसोबत ‘युवा’, ‘बस इतना सा ख्वाब है’ सारख्या चित्रपटात काम केले होते. त्यासोबत अभिषेक आणि राणीचा ‘बंटी और बबली’ हा चित्रपटही हिट ठरला होता.

Story img Loader