बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मात्र, एकवेळ अशी होती जेव्हा राज आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी वेगळे झाल्याचे कारण हे शिल्पा शेट्टी आहे अशा चर्चा होत्या.
राज कुंद्राची पूर्वाश्रमीची पत्नी कविताने २००७ मध्ये शिल्पावर काही आरोप केले होते. तर, राज आणि ती विभक्त होण्याचं कारण हे शिल्पा असल्याचं तिने सांगितलं होतं. त्यानंतर राजने सगळ्यांसमोर येऊन शिल्पाची जाहिरपणे माफी मागितली. एवढंच नाही तर ते दोघे फक्त चांगले मित्र आहेत आणि त्यांचे व्यावसायिक संबंध असल्याचे राजने सांगितले होते.
View this post on Instagram
राज म्हणाला होता की, “माझी पत्नी व मी नऊ महिन्यांपूर्वी विभक्त झालो आणि चार महिन्यांपूर्वी आम्ही घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आम्ही दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट घेण्याची कारणे चर्चा करण्यासारखी नाही ती वैयक्तिक आहेत आणि त्या कारणांवर चर्चा केली तर माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचे नाव खराब होईल आणि मला हे मान्य नाही. सध्या माझ्यात आणि शिल्पामध्ये व्यावसायिक सोडून कोणतेही संबंध नाही.”
View this post on Instagram
राज कुंद्रा पुढे म्हणाला, “माझ्या पत्नीने असा आरोप केला आहे की शिल्पामुळे आमचे लग्न मोडले आणि ते चुकीचे आहे कारण त्यावेळी शिल्पाशी माझा कोणताही संबंध नव्हता.”
आणखी वाचा : “पत्नीच्या भावाने CCTV बंद करुन मारले आणि आता…”,करण मेहराने सांगितली त्या रात्रीची कहाणी
शिल्पाची माफी मागतं राज म्हणाला, “मला वाईट वाटते की काही वैयक्तिक कारणांमुळे माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने एका लोकप्रिय सेलिब्रिटीचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने केलेल्या धक्कादायक आरोपासाठी मी शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटूंबाची माफी मागतो.”
आणखी वाचा : “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप
शिल्पा आणि राजने २००९ मध्ये लग्न केले आहे. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विवान त्यांच्या मुलाचे नाव आहे तर समीक्षा त्यांच्या मुलीचे आहे.