‘स्टुडंट ऑफ द इअर’ स्टार आलिया भट हिला तिचा सहअभिनेता आणि ‘मर्डर ३’ चा हिरो रणदीप हुडा याने त्यांचा आगामी चित्रपट ‘हायवे’च्या चित्रिकरणादरम्यान कानाखाली मारल्याचे वृत्त हाती आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चित्रपट निर्माते महेश भट यांची मुलगी आलिया भट प्रत्येक गोष्ट खूप गंभीरपणे घेते त्यामुळे चित्रपटातील ह्य़ा प्रसंगातही तिने डमी न वापरता स्वत:हूनच हा प्रसंग करण्याचे ठरवले.
‘लव्ह आज कल’ आणि ‘रॉकस्टार’ फेम दिग्दर्शक इम्तियाज अली या ‘हायवे’चे दिग्दर्शन करत आहे.
आलिया सध्या चेतन भगतच्या ‘२ स्टेट्स’ या कादंबरीवर आधारीत त्याच नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. तिच्यासोबत या चित्रपटात ‘इशकजादे’ स्टार अर्जुन कपूर काम करत आहे.

Story img Loader