बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी नेटकरी त्याची स्तुती करतात तर कधी दीपिकाच्या वस्तू चोरू नकोस असे म्हणत ट्रोल करतात. मात्र, रणवीरला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराला भेटायला किंवा त्याची एक झलक मिळाली पाहिजे असे नेहमी वाटते. त्यासाठी अनेक लोक हे चित्रपटाचे चित्रीकरण किंवा कोणते फोटो शूट सुरु असेल तिथे पोहोचतात. मात्र, अनेक वेळा त्या चाहत्यांना तिथून बाजूला किंवा बाहेर करण्यात येते, असचं काही तरी रणवीर सोबत झालं होतं. अभिनेती रवीना टंडनने रणवीरला सेटवरून बाहेर काढलं होतं. या विषयी स्वत: रणवीरने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

रणवीरने २०१५ मध्ये ‘द अॅक्टर्स राऊंड टेबल विथ राजीव मसंद’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. ही ९०च्या दशकातील गोष्ट आहे. “अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या ‘कीमत’ चित्रपटाचे चित्रीकरण एसएनडीटी कॉलेजमध्ये सुरु होते. माझे चुलत भाऊ आणि बहीण कॅनडाहून इथे आले होते. त्या सगळ्यांना फक्त अक्षय कुमारला भेटायचे होते. त्यामुळे माझ्या वडिलांनी मॅनेजरला फोन करून हे चित्रीकरण कुठे चालू आहे याची माहिती काढायला सांगितली. मला सुद्धा अक्षयला भेटायचे होते मी देखील त्यांच्यासोबत गेलो,” असे रणवीर म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर पुढे म्हणाला, “तिथे मी पाहिले की पावसात गाण्याचे चित्रीकरण सुरु आहे. रवीना खूपच सुंदर दिसत होत्या. मी माझ्या आयुष्यात इतकं सुंदर कोणालाही पाहिलं नव्हतं. मी तेव्हा लहान आणि जाड होतो. पुढचे दोन दात तुटले होते. अक्षय सरांनी शर्ट घातला होता, त्या शर्टाची बटणे उघडी होती आणि रवीना जी यांनी पांढर्‍या रंगाची साडी परिधान केली होती. मी टक्क लावून त्याच्याकडे पाहत होतो.”

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

रवीनाने जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तिला कसं तरी वाटलं. रवीनाला कळलं नाही की काय करायला पाहिजे. त्यावेळी रवीनाने एका सुरक्षा रक्षकाला बोलावलं आणि रणवीरला सेटच्या बाहेर काढलं. याविषयी सांगताना रणवीर म्हणाला, “माझ्यासाठी हे खूप वाईट होतं. मला सेटवरून बाहेर जाण्यास सांगितले. मला खूप दु: ख झाले होते.”

आणखी वाचा : ‘वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी…’, बॉयफ्रेंड नुपुरसोबत शॉपिंगकेल्यामुळे आयरा झाली ट्रोल

मात्र, जेव्हा अक्षय रणवीरला भेटायला सेटच्या बाहेर आला तेव्हा अक्षयला बरं वाटलं. अक्षयला कळलं होतं की रणवीरला याचं वाईट वाटलं असेल. त्यामुळे तो स्वत: रणवीरला भेटायला बाहेर आला होता आणि त्याने रणवीरच्या हेअरस्टाईलची स्तुती देखील केली. यामुळे रणवीरला अक्षयसोबत फोटो काढायला मिळाला. त्यादिवशी रणवीरने ठरवलं की तो अक्षय कुमार सारखा होईल.

Story img Loader