बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रवीना फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बेधडकपणे बोलण्यासाठी ही ती ओळखली जाते. बऱ्याचवेळा रवीना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचे मत मांडताना दिसते. एकदा तर रागात रवीनाने तिच्या पतीच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर रागात ज्युस फेकला होता.
ही घटना बऱ्याच वर्षांपूर्वी नवीन वर्षांच्या आगामनासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टित झाली होती. या पार्टीचे आयोजन रितेश सिधवानीने केले होते. रवीनाने पती अनिल थडानीसोबत त्या पार्टीत हजेरी लावली होती. यावेळी अनिल थडानी यांची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा सिप्पी सतत त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. रवीना आधी हे सगळं शांतपणे पाहत होती. त्यानंतर रवीनाला राग आला आणि हातात असलेला ज्युसचा ग्लास तिने नताशा यांच्या अंगावर फेकला.
आणखी वाचा : KBC 13 : १५ व्या प्रश्नाचे उत्तर देत सविता ठरणार शोच्या दुसऱ्या करोडपती?
आणखी वाचा : ‘दाल, गोश्त आणि कडक पाव…’, करीनाच्या घरातील शाही पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
या विषयी त्या दोघांशी काही वृत्तवाहिन्यांनी विचारणा केली होती. यावर रवीना म्हणाली होती की, “जर कोणी तिच्या पतीचा किंवा कुटुंबाचा अपमान करेल तर ती त्याला सोडणार नाही.” तर नताशा म्हणाल्या होत्या, “रवीना गरज नसताना असुरक्षित होत होती आणि तिने एवढ्या जोरात ज्युसने भरलेला ग्लास फेकला की तिचे बोट कापली गेली.” दरम्यान, रवीना आणि अनिल यांनी २००३ मध्ये लग्न केले असून त्यांच्या लग्नाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत.