मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांना ओळखले जाते. मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून त्यांची गणना केली जाते. सचिन पिळगावकर अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यादेखील गेली अनेकवर्ष मालिका, चित्रपटांमधून काम करताना दिसून येत आहेत. सचिन आणि सुप्रिया या दोघांची मुलगीदेखील अभिनयात सक्रिय आहे. ‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये श्रिया पिळगावकर हिने काम केले आहे. सचिन पिळगावकर यांचे मुलीवर किती प्रेम आहे हे आपण त्यांच्या मुलाखतीतून बघितले आहे. नुकताच सचिन पिळगावकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी पत्रकारांना चांगलेच सुनावले आहे.

सध्या चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रोज कोटींच्या घरात या चित्रपटाचा व्यवसाय होताना दिसून येत आहे. याच चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते आणि या स्क्रिनिंगला पिळगावकर कुटुंब उपस्थित होते. तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सचिन पिळगावकर भडकले आणि ते म्हणाले, ‘मला ऑर्डर करू नका याला बोलावा, त्याला बोलावा, तुम्हाला कळलं पाहिजे कोणाशी कसं बोलायचं ते’, असं ठणकावून सांगत ते चित्रपटगृहात गेले. चित्रपट संपल्यानंतर मात्र श्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर यांनी पत्रकारांना फोटो काढू दिले.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून याच चित्रपटातून पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हिंदी चित्रपटात त्यांनी अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडल्या. ‘अशी ही बनवा बनवी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नवरा माझा नवसाचा’ हे त्यांचे चित्रपट प्रेक्षक आजही आवर्जून बघतात.

Story img Loader