‘बजरंगी भाईजान’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त असलेला सलमान खान अलीकडेच महेशी पंड्या या त्याच्या चाहतीला भेटला. सलमानच्या या छोट्या चाहतीने त्याच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाचे पोस्टर स्वत:च्या हातांनी चितारले आहे. सलमानला भेटून हे पोस्टर स्वत:च्या हस्ते त्याला सुपूर्द करण्याची इच्छा तिने चित्रपटकर्त्यांकडे व्यक्त केली. आपल्या या छोट्याशा चाहतीचे प्रेम पाहून सलमानदेखील भावूक झाला. महेशा आणि सलमानने भेटल्यानंतर बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारल्या. सलमानने महेशाला चित्रकलेची आवड जोपासण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे ‘बजरंगी भाईजान’चे पोस्टर चितारून चित्रपटाला दर्शविलेल्या सहाय्यासाठी आणि त्याच्याप्रतीच्या आपुलकीसाठी तिचे आभार मानले. सलमानला भेटण्याचा अनुभव खूप छान होता, आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरले असल्याचे सांगत, सलमानने चित्रकलेची आवड जोपासण्याचा सल्लादेखील दिल्याचे महेशा म्हणाली. सलमान खान, करिना कपूर आणि नवाझुद्दिन सिद्दिकी यांचा अभिनय असलेला आणि कबिर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट येत्या १७ तारखेला चित्रपटगृहात झळकत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा