सुपरस्टार शाहरूख खान, आमिर खान, ह्रतिक रोशन आणि इतर अनेकांनी जेष्ठ अभिनेते धर्मेद्र आणि मुलगा सनी व बॉबी देओलसोबत मुंबईतील एका कार्यक्रमात पाय थिरकवले.
बॉलीवूडमधील दिग्गज शाहरूख खान, आमिर खान, ह्रतिक रोशन, जुही चावला, राकेश रोशन, रमेश सिप्पी, सुभाष घाई, कुणाल कोहोली, अनिल शर्मा यांनी मुंबईत पार पडलेल्या ‘यमला पगला दिवाना २’ च्या संगीत अनावरणाला हजेरी लावली होती.  
याशिवाय रितेश देशमुख, जेनेलिया, जॅकी भगनानी, चंकी पांडे आणि साशा अघा हे देखिल या कार्यक्रमाला उपस्थित होते.
संगीत अनावरणाच्या या कार्यक्रमात सुपरस्टार शाहरूख खान, आमिर खान, ह्रतिक रोशन यांनी धर्मेंद्रसोबत पाय थिरकवले. हे पाहून त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल यांनीही साथ दिली तेव्हा उपस्थितांनी टाळ्या वाजवून ठेक्यावर ताल धरला.
कार्यक्रमात सनी आणि शाहरूख एकमेकांच्या बाजूला उभे असल्याचे चित्र दिसले. ‘डर’ चित्रपटाच्या वेळी दोघांमध्येही शीतयुध्द सुरू असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
एवढंच नव्हे तर जुही आणि शाहरूख खान यांनाही या कार्यक्रमात एकमेकांशी बोलताना टिपण्यात आले. शाहरूख खानच्या कंपनीमधून जुहीच्या भावाऐवजी त्या पदावर नव्या माणसाची वर्णी लावल्याबद्दल जुही सध्या शाहरूखवर रागावलेली आहे.
मागील वर्षी बॉलीवूडचा बादशाह अमिताभ बच्चन याने ‘यमला पगला दिवाना’ च्या संगीत अनावरणाला वर्णी लावली होती. बॉलीवूडमधील बड्या कलाकरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल धर्मेंद्र यांनी सर्वांचे आभार मानले. 

Story img Loader