सात जुलै रोजी बॉलिवुडचा सुपरस्टार शाहिद कपूर व मीरा रजपूत विवाहबंधनात अडकले. शाहिदच्या संगीत समारंभात इशान असाकाही थिरकला की प्रसारमाध्यमांसह पाहूणे मंडळींनाही त्याच्या थिरकणे सोशल मीडियावर शेअर करण्याचा मोह आवरला नाही. शाहिदच्या संगीत समारंभात २०१३ रोजी प्रदर्शित झालेल्या फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटातील धतींग नाच या गाण्यावर शाहिदसोबत तो असा काही नाचला की पाहूण्यांचे लक्ष्य त्याने वेधून घेतले, व संगीत समारंभात त्याचीच चर्चा राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निलिमा अझीम व त्यांचे दुसरे पती राजेश खट्टर यांचा मुलगा इशान खट्टर हा शाहिदचा सावत्र भाऊ इशानही शाहिद प्रमाणेच श्यामक दावरयांच्याकडून नृत्याचे धडे घेत असून शाहिद प्रमाणेच बॉलीवूडमध्ये करीअर करण्याची त्याची इच्छा आहे. सध्या इशान दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या उडता पंजाब या चित्रपाटमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे.