अभिनेता शाहरुख खानचं त्याच्या मुलांवर जिवापाड प्रेम आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र मुलगी सुहानासोबत त्याचं बॉन्डिंग सर्वात खास आहे. सुहानाच्या सोशल मीडियावरील फोटो पाहता ती आपल्या वडिलांच्या किती जवळची व्यक्ती आहे हे लक्षात येतं. आता सुहाना आणि शाहरुख यांचं हेच बॉन्डिंग एका व्हिडीओमध्येही पाहायला मिळत आहेत. शाहरुखनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे.
शाहरुखनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सुहाना खान वडिलांना सल्ला देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान दुबईमध्ये शूटिंग करताना दिसत आहे. जसं शूट संपतं तसं त्याला सुहानाचा फोन येतो आणि ती त्याला विचारते की आता काय करणार आहात. त्यावर शाहरुख काही खास नाही असं उत्तर देतो. शाहरुखच्या बोलण्यावर सुहाना त्याला दुबई फिरण्याचा आणि एन्जॉय करण्याचा सल्ला देते. त्यानंतर शाहरुख तिथून निघून फिरायला जातो.
आणखी वाचा- “तो माझ्या बाथरुममध्ये…”, ट्रान्सवूमन सायशा शिंदेनं बॉयफ्रेंडबाबत केला धक्कादायक खुलासा
या व्हिडीओच्या अखेरीस सुहाना पुन्हा शाहरुखला कॉल करताना दिसते. ती विचारते की, त्याचा दिवस कसा गेला. त्यावर शाहरुख आनंदात म्हणतो, ‘तुझे खूप आभार, आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता.’ दरम्यान या व्हिडीओमधील शाहरुखच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अनेकांनी त्याच्या या लूकचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा- खरंच की काय! वर्षाअखेरीस लग्नाच्या बेडीत अडकणार ‘बाहुबली’ प्रभास?
शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं तर तो सध्या स्पेनमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’चं शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच हे तिन्ही कलाकार मुंबई एअरपोर्टला एकत्र स्पॉट झाले होते. या चित्रपटाच्या निमित्तानं जॉन अब्राहम आणि शाहरुख खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. तर दीपिका पदुकोण आणि शाहरुख यांनी याआधी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांचा हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.