सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीवास्तव कुटुंबाला फोन करून चौकशी केली. देशभरातील आणि विदेशातील त्यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. त्यांची प्रकृती गेले काही दिवस ठीक नसल्याचा दावा अभिनेते शेखर सुमन यांनी केला आहे.

शेखर सुमन यांनी अलीकडेच त्याचा मित्र राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत अपडेट देणारी पोस्ट टाकली आहे. दोघे पंधरा दिवसांपूर्वी इंडियाज लाफ्टर चॅम्पियन शोच्या सेटवर भेटले होते. शेखर पोस्टमध्ये असं म्हणाले, “राजूची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि तीन दिवसांपूर्वी त्याने बोटे हलवली होती आणि त्यात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. मला वाटत आहे की तो बरा होईल आणि त्याच्या प्रकृतीत आणखी सुधारणा होईल.”

‘ते स्वतःच्या पायावर…. ‘ अनुराग कश्यपची आदित्य चोप्रावर टीका

ते पुढे म्हणाले, “राजू १५ दिवसांपूर्वी इंडियाज लाफ्टर चॅम्पियनच्या सेटवर आला होता आणि आम्ही माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बराच वेळ गप्पा मारल्या होत्या. माझ्या लक्षात आले की तो थोडा अशक्त झाला आहे. मी त्याला सांगितलं आराम कर जास्त कष्ट करू नकोस. त्याने त्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी. यावर त्याने मला सांगितले की त्याला कोणताही आजार नाही आणि सर्व काही ठीक आहे आणि १५ दिवसांनी आम्हाला समजले की त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मी राजूला जवळपास २५ वर्षांपासून ओळखतो आणि ९०च्या दशकात आम्ही एका फिक्शन शो रिपोर्टरमध्ये एकत्र काम केले आहे. तो एक मोठा माणूस आहे आणि मला माहित आहे की संपूर्ण देश त्याच्यासाठी प्रार्थना करत असल्याने, तो लवकरच बरा व्हा. राजू हा खूप हुशार माणूस आहे आणि मी त्याच्या पुतण्याच्या आणि कुटुंबाच्या संपर्कात आहे.”

शेखर सुमन सध्या अर्चनापुरण सिंग सोबत भारताच्या लाफ्टर चॅम्पियन शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. ते पुढे म्हणाले, “विनोदी कार्यक्रमांचे परीक्षण करायला मजा येते. तसेच नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि आम्हाला रोज नवीन लोकांची गरज आहे.” शेखर सुमन गेली कित्येक वर्ष परीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे.

Story img Loader