भाजपा नेत्या आणि ‘बिग बॉस १४’ च्या स्पर्धक सोनाली फोगट यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. २२ ऑगस्ट रोजी रात्री त्यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये वाइल्कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. एलिमेशनमध्ये नाव आल्यानंतर पुरेशी मतं न मिळाल्याने त्यांना जानेवारी २०२१ मध्ये शोमधून बाहेर पडावं लागलं होतं. या एलिमिनेशन राऊंडमध्ये त्यांच्यासह रुबिना दिलैक, निक्की तांबोळी आणि राहुल वैद्य होते.

हेही वाचा – सोनाली फोगट यांच्या बहिणीने व्यक्त केला हत्येचा संशय; म्हणाल्या, “जेवणात काही तरी…”

विशेष म्हणजे, सोनाली फोगट आऊट झाल्याची घोषणा अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खानने नव्हे तर दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने केली होती. त्यानंतर सोनाली भावुक होऊन बिग बॉसच्या घरातून निघून गेल्या होत्या. योगायोग असा की सिद्धार्थ शुक्लाचं मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. तर, आता सोनाली फोगट यांचाही मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला. दरम्यान, सोनाली फोगट यांच्या निधनानंतर बिग बॉसमधील या एलिमिनेशन राऊंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

हेही वाचा – “मी सहानुभूती मिळवण्याचा…”; सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल शहनाजने सोडलं मौन

बिग बॉसमध्ये त्या ‘वीकेंड का वार’ला सलमान खान अनुपस्थित होता आणि त्याची जागा सिद्धार्थ शुक्लाने घेतली. त्याने उशीरा ट्विस्टेड इव्हिक्शन गेमची घोषणा केली. त्याने या राऊंडमध्ये कमी मतं मिळालेल्या रुबिना दिलैक, राहुल वैद्य, निक्की तांबोळी आणि सोनाली फोगट यांना त्यांच्या चेहऱ्यावरील जिगसॉ पझल्स सोडवण्यास सांगितलं. निक्की आणि सोनाली यांच्यात शेवटी निक्की जिंकली आणि सोनाली यांना बिग बॉसचं घर सोडावं लागलं होतं.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, सध्या सोनालीचा मृतदेह बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यांचे कुटुंबीय गोव्यात आल्यानंतर उद्या २४ ऑगस्टला शवविच्छेदन होईल. सोनाली या चित्रीकरणासाठी गोव्यामध्ये गेल्या होत्या.

Story img Loader