इंडिया ब्रायडल फॅशन विकच्या चौथ्या दिवशी सोनम कपूरने रोहित बल या नव्या डिझायनरसाठी रॅम्पवॉक केला. यावेळी सोनमने रोहितसह आ जाने जा या गाण्यावर नृत्य केले. त्यानंतर या दोघांनीही बॉलीवूड स्टायलमध्ये लटके, झटके मारुन टाळ्या आणि शिट्यांनी प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली.
सोनमने रॅम्पवॉक करताना परिधान केलेला सोनेरी नक्षीकाम असलेला पांढ-या रंगाचा घागरा हा मुघल वधूच्या पोशाखापासून प्रेरित होता. या पोशाखाप्रमाणेच तिने त्याला साजेसे दागिने परिधान केले होते. रोहितसोबत रॅम्पवॉक करताना आनंद झाल्याचे सोनम म्हणाली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 27-07-2013 at 04:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When sonam kapoor rohit bal shook leg on ramp