दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यांच्या चित्रपटांची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता असते. त्यांनी आतापर्यंत आघाडीच्या अनेक अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे. पण, एका चित्रपटाचं शुटिंग करताना रजनीकांत यांच्यावर श्रीदेवी थुंकल्या होत्या. खरं तर रजनीकांत व श्रीदेवी चांगले मित्र होते, त्यांनी अनेक सिनेमे एकत्र केले होते. पण जेव्हा श्रीदेवी रजनीकांत यांच्यावर थुंकल्या होत्या, तो सीन पाहून सगळे हैराण झाले होते.

“मी सिगारेट ओढत होतो अन्…”, सुबोध भावेने मंजिरीला रक्ताने लिहिलेलं पत्र; खुलासा करत म्हणाला…

ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
praful patel on raj thackeray ladki bahin statement
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य

‘१६ वयथिनिले’ या तमिळ चित्रपटात श्रीदेवी, कमल हासन आणि रजनीकांत मुख्य भूमिकेत होते. १९७७ मध्ये आलेल्या या चित्रपटात रजनीकांत खलनायकाच्या भूमिकेत होते आणि त्यांच्या पात्राचे नाव परत्तई होते. या चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये श्रीदेवींना रजनीकांत यांच्यावर थुंकावं लागलं होतं, पण रजनीकांत हे श्रीदेवीपेक्षा वयाने खूप मोठे असल्याने आणि ते मोठे स्टार देखील असल्याने त्या हा सीन करायला खूप कचरत होत्या.

कोणी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सुबोध भावे म्हणाला…

हा सीन करण्यासाठी श्रीदेवींनी अनेक टेक घेतले होते. त्यांना हा सीन करताना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे रजनीकांत यांनी श्रीदेवींना समजावून सांगितले आणि मग श्रीदेवींनी तो सीन केला होता. श्रीदेवींना रजनीकांतवर अशा प्रकारे थुंकताना पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच चकित झाले होते. ‘प्राइड ऑफ तमिळ सिनेमा’ नावाच्या पुस्तकातही या घटनेचा उल्लेख आहे. हा चित्रपट खूप यशस्वी ठरला होता. यानंतर श्रीदेवी आणि रजनीकांत यांनी अनेक चित्रपट एकत्र केले होते.