सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणून ‘श्रीदेवी’ यांना ओळखले जाते. श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळे बॉलिवूडसह देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांचे निधन झाले होते. आज त्यांची चौथी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने बॉलिवूडचे अनेक कलाकार त्यांच्या आठवणीत रमताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेत्री आलिया भट्टने श्रीदेवींची आठवण काढली आहे.

आलिया भट्ट ही सध्या तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच आलिया भट्ट हिने एका वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी आलियाला श्रीदेवी यांच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी ती म्हणाली, “मी लहानपणापासून श्रीदेवीची खूप मोठी फॅन होती आणि अजूनही आहे. माझ्या अनेक आठवणी त्यांच्याशी निगडित आहेत, ज्या मी कधीही विसरू शकत नाही.”

“माझ्या एका चित्रपटाचे स्क्रीनिंग होते आणि एकदा श्रीदेवी मला यशराजमध्ये भेटल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मला मिठी मारली होती आणि म्हणाल्या, आलिया तू अभिनयाची एक संस्था आहेस. श्रीदेवींनी केलेले हे कौतुक मी कधीही विसरु शकत नाही. आजही मला त्यांचे हे शब्द आठवून माझ्या अंगावर काटा उभा राहतो. ती माझ्यासाठी आदर्श होती आणि कायमच राहिल”, असेही आलिया भट्टने सांगितले.

संजय लीला भन्साळी यांना दिलासा, ‘गंगूबाई काठियावाडी’ स्थगिती देण्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानेच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

Story img Loader