दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आणला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे देशभरातून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनाची आणि त्यांची विचारसरणीवर देखील लोक चर्चा करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा दुआ मागतानाचा फोटो व्हायरल झाला होता. तर काही काळआधी अभिनेत्री तनुश्री दत्ताने विवेक यांच्यावर #MeToo मी टूचे आरोप केले होते. सध्या सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्यावर माजी मिस इंडिया यूनिवर्स तनुश्री दत्ताने मी टूचे आरोप केले होते. तनुश्रीने २०१८ मध्ये विवेक यांच्यावर हा आरोप केला होता. तनुश्रीने २००५ मध्ये चॉकलेट हा चित्रपट केला होता. यावेळी विवेक यांनी तिला कपडे काढून डान्स करायला सांगितल्याचा आरोप तिने केला होता. तनुश्री म्हणाली होती, “सेटवर चित्रपटातल्या एका सीनचे चित्रीकरण सुरु होते. तो त्यांचा क्लोज-अप शॉट होता. या सीनमध्ये इरफान खान यांना माझ्याकडे बघताच फेस एक्सप्रेशन द्यायचे होते. त्यासीनमध्ये मी दिसणारही नव्हते. तरी विवेक अग्निहोत्री मला म्हणाले कपडे काढून डान्स कर मुळात त्या सीनमध्ये मी नव्हतेच.”
आणखी वाचा : सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं…
पुढे तनुश्री म्हणाली, “तो त्यांचा क्लोज-अप शॉट होता. मी फ्रेममध्ये नाही. त्यांना माझ्याकडे बघून काही एक्स्प्रेशन द्यायचे होते. त्यांच्या क्लोज-अप शॉटमध्ये एक्सप्रेशन देण्यासाठी मला त्याच्यासमोर का नाचायला हवे? हा दिग्दर्शक मला ‘जाओ जाके कपडे उतार के नाचो’ म्हणतो. मला धक्काच बसला.” तनुश्रीच्या या आरोपांवर विवेक यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. तनुश्रीने पब्लिसिटीसाठी हे आरोप केले असल्याचं विवेक यांचं म्हणणं होतं.
आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी काजोल होणार तिसऱ्या बाळाची आई? या VIRAL VIDEO वरून चर्चा
आणखी वाचा : साडे सात वर्षांनी ‘या’ राशीचे लोक होणार साडेसाती पासून मुक्त
दरम्यान, द काश्मीर फाइल्स ह चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.