फॅशन डिझायनर बिभू महोपात्राचा सोमवारी मुंबईतील फॅशन शो सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या फॅशन शोसाठी अथिया शेट्टी, अभय देओल आणि संगीता बिजलानी यांच्यासारखे सेलिब्रेटी उपस्थित असताना प्रसारमाध्यमांच्या नजरा मात्र नताशा दलाल या तरूणीवर खिळल्या होत्या. नताशा ही बॉलीवूड अभिनेता वरूण धवनची कथित प्रेयसी असल्याचे सांगितले जाते. पहिल्या रांगेत बसून फॅशन शो पाहणाऱ्या नताश आणि तिच्या मैत्रिणीला सुरूवातीला कोणीही ओळखले नव्हते. मात्र, फॅशन शोदरम्यान गायिका दि लुसिओ गाणे म्हणताना तिच्याजवळ गेली आणि सगळ्यांना नताशा दलालच्या उपस्थितीची जाणीव झाली.
दरम्यान, फॅशन शो संपल्यानंतर नताशाला प्रसारमाध्यमांचा आणि छायाचित्रकारांचा गराडा पडला. यावेळी नताशाला तिच्या आणि वरूणच्या नात्याबद्दल विचारण्यात आले असता तिने केवळ शांतपणे हसत गर्दीतून वाट काढली. नताशा दलाल आणि वरूण धवन हे एकमेकांचे लहानपणीपासूनचे मित्र असून दोघेजण अनेकदा एकत्र फिरताना दिसून आले आहेत.
फॅशन शोमध्ये साऱ्यांच्या नजरा वरूण धवनच्या कथित प्रेयसीकडे!
पहिल्या रांगेत बसून फॅशन शो पाहणाऱ्या नताश आणि तिच्या मैत्रिणीला सुरूवातीला कोणीही ओळखले नव्हते.
Written by एक्सप्रेस वृत्तसेवा

First published on: 19-04-2016 at 14:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When varun dhawan rumoured girlfriend natasha dalal grabbed spotlight at a fashion show