‘हमारी अधुरी कहानी’ या आगामी चित्रपटात घरगुती हिंसेला बळी पडलेल्या महिलेची व्यक्तीरेखा साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन चित्रपटातील काही प्रसंगांचे महत्त्व ओळखून त्याचे वास्तवतावादी चित्रीकरण व्हावे यासाठी मेहनत घेत आहे. चित्रपटातील एका प्रसंगाच्या मागणीनुसार विद्या बालनच्या पतीची भूमिका साकारणाऱया अभिनेता राजकुमार रावने विद्या बालनच्या कानशिलात लगावण्याच्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यात आले. यावेळी केवळ देखावा केल्यासारखे चित्रीकरण न करता राजकुमारने विद्या बालनच्या खरोखर कानशिलात लगावली. तेव्हा दिग्दर्शकासह इतर सर्वच अचंबित झाले कारण, सहसा कानशिलात लगावण्याचे प्रसंग देखावा पातळीवरच चित्रीत केले जातात. मात्र, राजकुमारने विद्याच्या खरोखर कानशिलात लगावली तेव्हा सुरूवातीला सर्वांना धक्काच बसला. परंतु, कानशिलात लगावल्यानंतर विद्याने आपला पुढील संवाद सुरू ठेवल्यावर दोघांनी चित्रीकरणाआधीच प्रसंग वास्तवतावादी वाटावा यासाठी एकमेकांशी याबाबत चर्चा करून हे ठरवून केल्याची कल्पना आली आणि चित्रीकरण पूर्ण केले गेले, असे चित्रीपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा