बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावलाने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. सुरवीन तिची मुलगी इवासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मुलीच्या जन्मानंतर सुरवीन लवकरच ‘सेक्रेड गेम्स २’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. सुरवीनने सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनमध्ये जोजोची भूमिका साकारली होती. पहिल्या सिरिजच्या चित्रीकरणादरम्यान सुरवीन गरोदर होती. त्या वेळचा एक किस्सा सुरवीनने शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुरवीनने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे. ‘सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनच्या वेळी मी गरोदर असल्यामुळे मला जोजोची भूमिका निभावणे थोडे कठीण झाले होते. मी लवकर थकून जायचे. माझ्यासाठी जोजोची भूमिका आव्हानात्मक होती. पण मी हिम्मत न हारता ती साकारली. मी या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली. कधी कधी तर मला सेटवरुन पळून जायची इच्छा व्हायची’ असे सुरवीनने मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

‘सेक्रेड गेम्स २’चे दिग्दर्शन अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी केले आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी ही सीरिज ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सिझनमध्ये न मिळालेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या सिझनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.