आपण पाहत असलेल्या सिनेमा, टीव्ही मालिकेतील कलाकारांचे आयुष्य नेहमीच एक दिखावा असतो. तो दिखावा संपल्यावरचे त्यांचे माणूसपण हे सामान्य नागरिकांच्या आयुष्यासारखेच असते. फक्त त्यातील चढ-उतारांचे स्वरूप सारखे नसते. सुख-दु:खांची मात्रा किंवा वेदना-संवेदना अनुभविण्यासाठी सेलिब्रेटी किंवा सामान्य असण्याची गरज लागत नाही. ती दोहोंच्या वाटेला सारखीच असते. फक्त ती टाळण्यासाठीचा संघर्ष म्हणजे आयुष्य असल्याचा निष्कर्ष आपण अध्यात्माकडून काढतो. आपल्याकडे एकीकडे अध्यात्मगुरूंच्या थोतांडावर बरेच चर्वितचर्वण होत असताना परदेशात मात्र त्या अध्यात्माचा दाखला देण्याची त्याचा अंगीकार करण्याची असोशी मोठी आहे. तेथे गुरू-बाबा आणि योगसाधना लोकांच्या जगण्याचा भाग बनली असून छोटय़ा अन् मोठय़ा पडद्यावर अध्यात्मसल्ला आपसूक उतरत आहे. ‘हू इज अॅलिस’ नावाची एक ब्रिटिश फिल्म गेल्या काही महिन्यांपासून विविध महोत्सवांमध्ये गाजत सध्या कल्टहीट बनली आहे. तिचा विषय थेट अध्यात्माशी निगडित आहे. पण ती या साऱ्याकडे फार गमतीने पाहत असल्यामुळे आयुष्याचे तत्त्वज्ञान वगैरे जाणून घेण्यासोबत मुबलक मनोरंजनही येथे पाहायला मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा