Who Is Apoorva Makhija: कॉमेडियन समय रैनाचा युट्यूब शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांसाठी वादग्रस्त राहिला आहे. या शोमध्ये तरूण खुलेआम शिव्या आणि अश्लील विधाने करत असतात. कमरे खालचा विनोद करून कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला जातो. काही दिवसांपूर्वी रणवीर अलाहाबादियाने या शोमध्ये पाहुणा म्हणून उपस्थिती लावली होती. त्याच्या एका आक्षेपार्ह टिप्पणीमुळे सध्या वादंग उठले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह अनेक राजकारण्यांनी याची दखल घेऊन कारवाई करणार असल्याचे सुतोवाच केले आहे. त्यातच आता या शोमध्ये सहभागी झालेली कॉमेडियन अपूर्वा मुखिजा हीचाही एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमत एका स्पर्धकाला रोस्ट करताना अपूर्वा मुखिजा नको ते बोलून बसली.

कोण आहे अपूर्वा मुखिजा?

रणवीर अलाहाबादीया, समय रैना यांच्यासह अपूर्वा मुखिजा हीचेही तक्रारीत नाव समाविष्ट आहे. सोशल मीडियावर अपूर्वा ‘द रिबल किड’ या नावाने ओळखली जाते. अपूर्वाचे इन्स्टाग्रामवर २.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर ५ लाख सबस्क्रायबर आहेत. करोना काळातील इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकून ती प्रसिद्धिस आली होती. मुळची नोएडाची असलेल्या अपूर्वाने मणिपाल विद्यापीठ, जयपूर येथून शिक्षण पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर अपूर्वाकडे आज गुगल, ॲमेझॉन, मेटा, स्विगी, मेबेलिन असे आंतरराष्ट्रीय ब्रँड आहेत. २०२३ मध्ये तिने अभिनय क्षेत्रातही पदार्पण केले होते.

Gaurav Gogoi on Ranveer Allahbadia
Ranveer Allahbadia: “अशा लोकांना तुम्ही…”, रणवीर अलाहाबादियाचे एकेकाळी कौतुक करणाऱ्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस खासदाराचा सवाल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
mumbai police started inquiry to ranveer allahabadias and Samay Raina on obscene and controversial statement
Maharashtra Breaking News LIVE Updates : रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर शिवसेना खासदाराने लोकसभेत मांडला मुद्दा, ‘सेन्सॉर’ची केली मागणी!
Tanaji Sawant Son Missing
Tanaji Sawant Son Missing : तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत सुखरुप परतला; नेमकं काय झालं होतं? पुणे पोलिसांनी दिली मोठी माहिती
Viral Video Surat
VIDEO : बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारख्या ३० अलिशान गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या अन्…; शाळकरी मुलांंच्या ‘त्या’ कृत्याने सर्वच हैराण!
next cm in delhi wont stay in sheeshmahal
Delhi CM: दिल्लीतला ‘शीशमहल’ ओस पडणार? भाजपाचे मुख्यमंत्री निवासस्थान बदलणार!
Dhruv Rathee on Ranveer Allahbadia Comment
रणवीर अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल युट्यूबर ध्रुव राठीची प्रतिक्रिया; ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाशी तुलना करत म्हणाला…
pushkar jog angry over ranveer allahbadia controversial statement
“त्या शोमध्ये अश्लील, अचरटपणा…”, समय रैनावर मराठी अभिनेता भडकला! रणवीर अलाहाबादियाबद्दल म्हणाला, “ही कॉमेडी…”

अपूर्वाची वादग्रस्त टिप्पणी काय होती?

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला रोस्ट करताना अपूर्वाने स्त्री योनीबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लिल अशी टिप्पणी केली. तसेच मला उंचपूरा ६ फुटांचा नवरा असल्याचे सांगत होणाऱ्या नवऱ्याच्या लिंगाबद्दलही अभद्र असे भाष्य केले. आता अपूर्वाच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे.

रणवीर अलाहाबादीयाने त्याच्या विधानाबाबत माफी मागितली आहे. मात्र अपूर्वा मुखिजाने अद्याप तिच्या विधानाबाबत कोणतीही टिप्पणी दिलेली नाही. दरम्यान या शोचे व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून कॉमेडीच्या नावाखाली कमरेखालचे विनोद करणाऱ्या यूट्यूबर्सना ट्रोल करण्यात येत आहे.

Story img Loader