Who is Cyanide Mohan?: अॅमेझॉन प्राईमवर ‘दहाड’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजची चांगलीच चर्चा सोशल मीडियावरही रंगली आहे. सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शाह आणि गुलशन देवय्या या चौघांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज एका सीरियल किलरवर बेतली आहे. मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्यांची खास पद्धतीने हत्या करणाऱ्या सीरियल किलरवर ही सीरिज बेतली आहे. विजय वर्माने या सीरिजमध्ये सायको किलरची भूमिका केली आहे. विजय वर्माची भूमिका ज्या व्यक्तीवर बेतली आहे तसाच एक सीरियल किलर खरोखरच होता. त्याला ‘सायनाईड मोहन’ असं नाव देण्यात आलं होतं.

कोण होता सायनाईड मोहन?

सायनाईड मोहन हा एक क्रूरकर्मा आणि थंड डोक्याने खून करणारा अपराधी होता. मुलींना तो आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर तो त्यांची हत्या करत असे. दहाड या वेबसीरिजमध्ये विजय वर्माने साकारलेलं आनंद स्वर्णकार हे पात्र याच गुन्हेगारावर बेतलेलं आहे. या सायनाईड मोहनचं खरं नाव मोहन कुमार असं होतं. तो एक शिक्षक होता. २००३ ते २००९ या कालावधीत त्याने कर्नाटकात २० मुलींची हत्या केली. २५ ते ३० वर्षांच्या मुलींना तो हेरत असे. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. लग्न करण्याचं वचन देऊन त्यांच्यासह शारिरीक संबंध ठेवत असे त्यानंतर गर्भनिरोधक गोळी देऊन त्यांना सायनाईड खाऊ घालत असे. मुलीचा मृत्यू झाला की तिच्या अंगावरचे दागिने आणि पैसे घेऊन मोहन पळून जात असे.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Ashish Shelar On Saif Ali Khan Attack
Ashish Shelar : “अतिशय भितीदायक घटना, आरोपीच्या शोधासाठी…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेबाबत आशिष शेलारांची महत्वाची माहिती
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
27 yearold woman raped by minor
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न

सायनाईड मोहन सध्या कुठे आहे?

सायनाईड मोहन सध्या बेळगावीच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतो आहे. त्याला २००९ मध्ये मेंगलुरुमधल्या एका गावातून अटक करण्यात आली होती. सायनाईड मोहनने २००३ ते २००९ या कालावधीत २० मुलींची गर्भनिरोधक गोळी देऊन हत्या केली. २००९ मध्ये त्याने अनिता नावाच्या मुलीला अशा पद्धतीने मारलं तेव्हा त्या मुलीला त्याने स्वतःचं नाव आनंद आहे असं सांगितलं होतं.

२००३ मध्ये नेमकं काय घडलं होतं?

२००३ मध्ये कर्नाटकातल्या एका शहरात एका महिला प्रसाधन गृहाबाहेर महिलांची रांग लागली होती. आतून दरवाजा बंद होता. कुणीही प्रतिसाद देत नव्हतं. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी महिला प्रतिसाद देत नाही म्हणून दरवाजा तोडला. तेव्हा आत त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ३० वर्षांची ती महिला एखाद्या लग्नाला जावं तशी तयार झाली होती. मात्र तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता. पोलिसांनी यामागे कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कुणीही सापडलं नाही. त्यानंतर याच वर्षी म्हणजेच २००३ मध्ये काही महिन्यांनी आणखी मृतदेह पोलिसांना अशाच पद्धतीने सापडला. २००९ पर्यंत एकूण २० मुलींचे मृतदेह पोलिसांना अशाच पद्धतीने आढळले. मोहन कुमारने या सगळ्यांची हत्या केली. त्याने केलेल्या सगळ्या हत्यांचा पॅटर्न एकच होता. गर्भनिरोधक गोळीवर सायनाईड लावून ती गोळी मुलीला खायला देणं. २००९ मध्ये नाट्यमय पद्धतीने मोहन पकडला गेला. ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

मोहन नेमकं काय करायचा?

मोहन हा पेशाने शिक्षक होता. तो लग्न न झालेल्या तरुण मुली हेरून त्यांच्याशी मैत्री करायचा. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. शारिरीक संबंध ठेवून त्या मुलींना लग्नाचं वचनही द्यायचा. आपण पळून जाऊन लग्न करु असं सांगायचा. मुली स्वखुशीने घरातील पैसे, दागिने घेऊन येत असत. सायनाईड देऊन या मुलींना ठार केलं की त्यांच्या अंगावरचे दागिने आणि पैसे घेऊन तो तिथून पळून जात असे. काही महिन्यांनी दुसऱ्या मुलीला हेरत असे. प्रत्येक खुनासाठी त्याने सायनाईडचा वापर केल्याने त्याचं नाव सायनाईड मोहन असं पडलं. त्याला २०१३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जी शिक्षा नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली. आता मोहन बेळगावी तुरुंगात शिक्षा भोगतो आहे. एक शिक्षक म्हणून साळसूदपणे वावरणारा हा मोहन सीरियल किलर असेल आणि अशा पद्धतीने त्याने हत्या केल्या असतील याची कल्पनाही कुणी केली नव्हती. १२ मे रोजी आलेली दहाड ही वेबसीरिज याच सायनाईड मोहनवर बेतलेली आहे.

Story img Loader