‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता जॉनी डेप हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्याच्या खासगी आयुष्यामुळे या चर्चा सुरु आहेत. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्डच्या विरोधात जॉनीने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल केल्याने तो चर्चेत आला होता. जॉनी डेप आणि अँबर हर्डचा सुरु असलेला मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. त्यामुळे आता अँबर हर्डला जॉनी डेपला १५ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी द्यावे लागणार आहे. मात्र अलीकडेच तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चर्चा त्याच्या सध्याच्या रिलेशनशिपमुळे सुरु आहेत.

जॉनी डेप हा सध्या त्याच्या वकिलांच्या टीममधील एका तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जोएल रिच असे या तरुणीचे नाव आहे. ती लंडनमध्ये स्थायिक असते. विशेष म्हणजे ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचेही बोललं जात आहे. या चर्चांनंतर जोएल रिच नक्की कोण आहे? याबद्दल नेटकऱ्यांनी शोधमोहिम सुरु केली आहे.
आणखी वाचा : अनुष्का शर्माने न आवडलेले फोटो केले शेअर, एक्स बॉयफ्रेंड कमेंट करत म्हणाला…

जॉनी डेप आणि जोएलची लव्हस्टोरी

अभिनेता जॉनी डेप आणि जोएल २०१८ पासून एकमेकांना ओळखतात. २०१८ मध्ये द सन या वृत्तपत्राविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यात जोएलने डेपसोबत काम केले होते. त्या दरम्यान त्या दोघांची मैत्री झाली. पण दुर्देवाने जॉनी डेपला द सन या वृत्तपत्राविरुद्धचा खटला गमवावा लागला होता. त्यानंतर आता मे-जून या दरम्यान अँबर हर्ड विरुद्ध सुरु असलेल्या खटल्यादरम्यान जोएल ही कोर्टरुममध्ये उपस्थित असायची. या खटल्यादरम्यान ती जॉनी डेपच्या वकिलांच्या टीमचा भाग नव्हती. पण जॉनी डेपला पाठिंबा देण्यासाठी ती कोर्टरुममधील बहुतांश सुनावणीदरम्यान हजर असायची. याच काळात त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघेही त्यांच्या या नात्याबद्दल गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळेच आता लवकरच जॉनी डेप आणि जोएल विवाहबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा : जॉनी डेपने घेतला भारतीय बटर चिकन आणि नानचा आस्वाद, ५ तासात हॉटेलचे बिल झाले इतके लाख

कोण आहे जोएल रिच?

जोएल रिच ही लंडनमधील एक प्रतिष्ठित वकील आहे. ती ३७ वर्षांची आहे. तिने २००३ ते २००६ या काळात इंग्लंडमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. या विद्यापीठातून तिने कायद्याची पदवी मिळवली. त्यानंतर २००६ ते २००७ या काळात तिने लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. यादरम्यान ती मीडिया आणि एंटरटेनमेंट, मालमत्ता अधिकार, व्यावसायिक आणि खाजगी अधिग्रहण या विषयांमध्ये अभ्यास करुन ती त्यात तज्ञ झाली.

जोएल ही ३७ वर्षांची असून ती लंडनमध्ये स्थायिक आहे. ती शिलिंग्जमधील आंतरराष्ट्रीय कायदा फर्ममध्ये भागीदार म्हणून काम करते. तिच्या लिंकिंड इन प्रोफाईलनुसार, एखादी व्यक्ती किंवा कुटुंब यांना सार्वजनिक ठिकाणी नजरेला नजर भिडवून त्यांची गोपनियता आणि प्रतिष्ठा जपता आली पाहिजे. मानहानी, गोपनीयता आणि कॉपीराइट या विषयातील कायद्यांची उत्तम ज्ञान आणि तज्ज्ञ असे तिने यात म्हटले आहे.

लवकरच घेणार पहिल्या पतीपासून घटस्फोट

जोएल रिच ही विवाहित असून जोनाथन रिच असे तिच्या पतीचे नाव आहे. तिचा पती ब्लूबॉक्स कॉर्पोरेट फायनान्स ग्रुपचा संचालक म्हणून काम करतो. जोएल आणि जोनाथनला दोन मुलं आहेत. पण आता लवकरच ती तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त होणार आहे. अद्याप त्या दोघांचा घटस्फोट झालेला नसला तरी ते प्रकरण अद्याप न्यायलयात प्रलंबित आहे.

आणखी वाचा : Johnny Depp Vs Amber Heard: जॉनी डेपच्या बाजूने कोर्टाचा निकाल, एंबर देणार ११६ कोटींची भरपाई

दरम्यान जोएल रिच ही लंडनमधील प्रतिष्ठित वकिलांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक उच्चभ्रू व्यक्तींचे प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या फर्मने २०२१ मध्ये मेल विरुद्धच्या खटल्यात मेघन मार्कलचे प्रतिनिधित्व केले होते.

वार्षिक कमाई किती?

जोएल रिच ही वर्षाला २ कोटीहून अधिक कमाई करते. हा पगार ब्रिटनमधील इतर वकिलांच्या तुलनेत फार जास्त आहे. सध्या ती तिच्या पती आणि मुलांसह व्हिलामध्ये राहत आहे. या व्हिलाची किंमत १५ कोटी रुपये आहे.

Story img Loader