मंजू वॉरियर ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर आणि उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. ४४ वर्षांच्या मंजूचं वय खूप तरुण दिसते. आपल्या अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचं वैवाहिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं राहिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामूहिक बलात्कार, ५ लग्न, ब्रेस्ट सर्जरी अन् सेक्स टेप; कायमच चर्चेत असते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

मंजूने वयाच्या १७ व्या वर्षी मल्याळम चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. १९९५ साली आलेला ‘सक्ष्यम’ हा तिचा पहिला चित्रपट होता. मंजूने आतापर्यंत जवळपास ३० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘आज तक’च्या वृत्तानुसार तिला राष्ट्रीय, फिल्म फेअर, राज्य सरकारचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने पळून जाऊन दिलीपशी लग्न केलं होतं.

Video: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुडा समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी

२० ऑक्टोबर १९९८ रोजी दिलीप आणि मंजूने पळून जाऊन लग्न केलं होतं. मंजू आयुष्यात आल्यावर दिलीप मल्याळम इंडस्ट्रीत सुपरस्टार झाला. पण नंतर मंजूची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली. दिलीपचं आधीच लग्न झालं होतं, असं म्हटलं जातं. दिलीपचं नात्यातील एका मुलीशी लग्न झालं होतं आणि त्याच्या लग्नाची नोंदणी झाली होती. हे १९९० मध्ये घडलं होतं. याबाबत कळताच मंजूने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Video: नीता अंबानींनी केलं धाकट्या सूनेचं स्वागत; नणंद इशाच्या बाळाला खेळवताना दिसली राधिका, पाहा साखरपुड्यातील खास क्षण

मंजू व दिलीपला मीनाक्षी नावाची मुलगी आहे. मंजू फक्त पतीच्या पहिल्या लग्नामुळेच नाही, तर त्याच्या आणखी एका अफेअरमुळे विभक्त झाल्याचं म्हटलं जातं. दिलीपचं काव्याशी अफेअर होतं आणि घटस्फोटानंतर त्याने तिच्याशी लग्नही केलं. दुसरीकडे मंजू वडिलांबरोबर राहते. पालक म्हणून ती व दिलीप लेकीला सांभाळतात.

अशातच २०१७ साली केरळमध्ये एका अभिनेत्रीच्या अपहरणाची घटना समोर आली होती. सहा जणांनी अभिनेत्रीचं अपहरण करून तिचं शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पल्सर सुनी मुख्य आरोपी होता, तर मंजूचा पूर्व पती दिलीपही सहभागी होता. मुख्य आरोपीला पाठीशी घालणाऱ्या दिलीपला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मंजूचीही चौकशी करण्यात आली होती, पण तिने आपला घटस्फोट झाला असून या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

मंजू सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is manju warrier married life movies husband affair and daughter know details hrc