चेटकिणीवर आधारीत एकता कपूरच्या ‘एक थी डायन’ या चित्रपटात तीन नायिकांपैकी एक चेटकीण आहे. हुमा कुरेशी, कलकी कोचलिन आणि कोंकणा सेन-शर्मा या तिघींमध्ये चेटकीण कोण याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. मात्र, आता एकताने दडवून ठेवलेली मुख्य गोष्ट समोर आली आहे. या चित्रपटातल्या तिघींपैकी एकीची कथा ही बॉलिवूडची ‘खूबसूरत’ अभिनेत्री रेखाच्या आयुष्यावर बेतलेली आहे. आता या बाहेर पडलेल्या गुपितातून अनेक प्रश्नांना पुन्हा नव्याने जन्म दिला आहे.
‘एक थी डायन’ हा चित्रपट चेटकि णीची कथा सांगतो आहे, हे उघड वास्तव आहे. मग चेटकिणीच्या कथेचा आणि रेखाचा काय संबंध?, हा प्रश्न आपल्याला पडत असला तरी रेखाबरोबर काम केलेल्या बॉलिवूडच्या जुन्याजाणत्या मंडळींना यात वावगे वाटत नाही. रेखाचे आयुष्य हे नेहमीच सर्वसामान्यांसाठी आणि बॉलिवूडच्या जाणकारांसाठीही रहस्यमय राहिले आहे. किंबहुना तिच्या आयुष्यात घडलेल्या अनाकलनीय घटनांमुळे तिच्याबद्दलचे गूढ वाढतच गेले आहे. चेटूक, काळी जादू अशा गोष्टींचे रेखाला पहिल्यापासून आकर्षण होते. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रारंभी रेखाच्या आयुष्यातील बारीकसारीक गोष्टींविषयी संशोधन व अभ्यास करण्याचे एकताने प्रॉडक्शन टीमला सांगितले होते. त्यानुसार रेखाला खरोखरच जादूटोणा आणि मंत्रतंत्र यात विशेष रस असल्याचे आढळून आले.

Story img Loader