Rhea Singha is Miss Universe India 2024 :अवघ्या १८ वर्षांची भारतीय सौंदर्यवती रिया सिंघा मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ठरली आहे. ती आता जागतिक स्तरावर मिस युनिव्हर्स 2024 या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. देशभरातून ५० हून अधिक तरुणींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सर्वांना मागे टाकत ती यंदाची मिस युनिव्हर्स इंडिया ठरली.

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला. ही स्पर्धा रियाने जिंकली. मिस युनिव्हर्स २०१५ उर्वशी रौतेलाने रिया सिंघाला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा मुकुट घातला. प्रांजल प्रिया या स्पर्धेची पहिली रनर-अप ठरली, तर छवी दुसरी रनर अप राहिली. सुष्मिता रॉय तिसरी आणि रुओफुझानो व्हिसो ही चौथी रनर-अप राहिली.

Pratika Rawal World Record She Scored 444 Runs in Just 6 Matches After International Debut in Womens ODI
INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pratika Rawal Maiden ODI Century in INDW vs IREW New India Opener After Continues Fifties
INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
a unique sanyog created on paush Purnima after 144 years
१४४ वर्षानंतर पौष पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचा दुर्लभ संयोग, या चार राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Devdutt Padikkal smashes hundred in quarterfinal against Baroda in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी
Who is the Indian Shubham Ranjan who will play in BPL 2025 in Bangladesh
BPL 2025 : मराठमोळा शुभम रांजणे बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान

Bigg Boss Marathi: अरबाज पटेल घराबाहेर पडल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेत; शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

रिया सिंघा आपल्या मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धा जिंकल्यावर खूप आनंदी आहे. एएनआयशी बोलताना रिया म्हणाली, “आज मी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ही स्पर्धा जिंकली आहे. मी सर्वांची खूप आभारी आहे. मी इथे पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. माझ्या या प्रवासात मला या स्पर्धेच्या आधीच्या विजेत्यांकडून खूप प्रेरणा मिळाली.”

पाहा व्हिडीओ –

निखिल आनंद, अभिनेत्री आणि माजी ब्युटी क्वीन उर्वशी रौतेला, गुयेन क्विन, फॅशन फोटोग्राफर रियान फर्नांडिस आणि उद्योगपती राजीव श्रीवास्तव हे या स्पर्धेचे परीक्षक होते.

मराठमोळ्या शिबानी दांडेकरने पतीच्या पहिल्या बायकोचं केलं कौतुक; सावत्र मुलींबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाली, “त्या खूप…”

कोण आहे रिया सिंघा?

Who is Rhea Singha: १८ वर्षांची रिया मूळची अहमदाबाद, गुजरातची आहे. आता ती मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. रिया एक अभिनेत्री आहे. तिने परफॉर्मिंग आर्ट्समध्ये डिग्री पूर्ण केली आहे. तसेच ती फॅशन डिझायनर देखील आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ३९ हजार फॉलोअर्स आहेत.

Story img Loader