बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनाक्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, कधी तिच्या रिलेशनशिप किंवा मग तिच्या लग्नाच्या चर्चा झाल्या नाही. मात्र, आता अशा चर्चा आहेत की लवकर शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक ही सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदेवाशी लग्न करणार आहे. हा बंटी सचदेवा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सोनाक्षी आणि बंटी यांच नाव गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र घेतलं जातं आहे. बंटी आणि सलमानच्या कुटुंबाचं एक खास नातं आहे. बंटी हा सलमानचा लहान भाऊ सोहेल खानचा मेहूणा आहे. बंटी घटस्फोटीत आहे. त्याचं पहिलं लग्न हे २००९ मध्ये झाले होते. त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचे नाव अंबिका चौहान आहे. अंबिका ही गोव्याची आहे. त्यांनी डेस्टिनेशन लग्न केले होते. एवढचं नाही तर त्यांच्या लग्नात सलमानने ही सरप्राईज एण्ट्री केली होती.

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

आणखी वाचा : “आमच्याबद्दल खोटं पसरवून…”, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपावर अखेर सुनील बर्वेंनी सोडले मौन

सोनाक्षी आधी बंटीचे नाव सुष्मिता सेन, दिया मिर्झा, नेहा धुपिया आणि समीरा रेड्डी सारख्या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. तर २०१२ पासून सोनाक्षी आणि बंटी रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले आहे. बंटी सजदेह हा स्पोर्ट्स आणि सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून ओळखला जातो.

Story img Loader