Vaibhavi Upadhyay Passes Away : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा हिमाचल प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. वयाच्या ३२ व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वैभवी उपाध्याय तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर हिमाचलमध्ये फिरण्यासाठी गेली होती. या वेळी प्रवासादरम्यान एका तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. अभिनेत्रीच्या भावाने अपघातस्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून वैभवीच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : Video : पापाराझींनी फोटोसाठी थांबवल्यावर अनुष्का शर्माने स्पष्टच सांगितले, म्हणाली, “बच्चा साथ में…”
वैभवीने तिच्या कार्यकाळात अनेक दिग्ग्ज कलाकारांबरोबर काम करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली, ती मूळची मुंबईची होती. वैभवी ही भाऊ अंकित उपाध्याय आणि कुटुंबीयांबरोबर मुंबईत राहत असे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’या मालिकेत अभिनेत्रीने जस्मिनची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून वैभवी घराघरांत पोहोचली. यानंतर तिने ‘क्या कुसूर है अमला का’, ‘सीआयडी’, ‘अदालत’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या. सोशल मीडियावर वैभवी फारशी सक्रिय नव्हती. तरीही तिचे इन्स्टाग्रावर ७१ हजारांहून अधिक फॉलोवर्स होते.
हेही वाचा : “मला चित्रपट मिळत नव्हते…” बॉलीवूडमधील संघर्षाबाबत क्रिती सेनॉनचे मोठे वक्तव्य
टीव्ही मालिकांव्यतिरिक्त वैभवी उपाध्यायने अभिनेता राजकुमार रावबरोबर ‘सिटी लाइट्स’, दीपिका पदुकोणबरोबर ‘छपाक’ या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली होती. तसेच अॅमेझॉन मिनी टीव्हीवरील गाजलेली वेब सीरिज ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ यामध्ये वैभवीने आयुष मेहरा आणि बरखा सिंगबरोबर काम केले होते. ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ मध्ये तिने साकारलेल्या ‘टीम लीडर रत्ना घोष’च्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.