प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं काल १६ फेब्रुवारी रोजी निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे. त्यांचे सोन्यावर असलेले प्रेम सगळ्यांना माहितचं आहे.
बप्पी लहरी नेहमीच गळ्यात सोन्याच्या जाड चेन, हातात जाड कडे आणि बऱ्याच अंगठ्या अशा अनेक गोष्टी ते परिधान करायचे. बप्पी दा यांच्या निधनानंतर त्यांचे सोने कोणाला मिळणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. बप्पी दा यांच्याकडे १ किलोहून अधिक सोनं होतं. बप्पीदा यांनी त्यांच्या प्रत्येक चेनला एक नावं दिलं होतं. प्रत्येक धनत्रयोदशीला ते एक नवीन सोन्याची चेन खरेदी करायचे.
आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात
बप्पीदा यांच्या जवळच्या व्यक्तींप्रमाणे हे त्यांच्या दागिन्यांची काळजी घ्यायचे. ते स्वत: त्यांच्या दागिन्यांची साफसफाई करायचे. बप्पीदांकडे चेन, पेंडेंट, अंगठ्या, कडे, गणेशाची मूर्ती, हीरे जडीत कडे एवढंच काय तर सोन्याची फोटो फ्रेम आणि सोन्याच्या कफलिंक सुद्धा आहेत. हे सगळे दागिने एक प्रोटेक्टिव बॉक्समध्ये आहेत.
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?
त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार बप्पीदा यांचा मुलगा बप्पा आणि मुलगी रीमा यांनी बप्पीदांचे सर्व दागिने संरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना त्यांच्या वडिलांचे सर्व दागिने सुरक्षित ठेवायचे आहेत.