अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर भविष्यात एकमेकांसोबत काम करण्याची शक्यता फारच कमी आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील त्यांच्या उत्तरांवरून तरी निदान असेच दिसून आले. तुम्ही दोघे ‘जब वी मेट’च्या दुसऱ्या भागात एकत्र काम करणार का, असा प्रश्न यावेळी दोघांना विचारण्यात आला. त्यावेळी शाहिद आणि करिनाने दिलेली उत्तरे पाहता दोघांमधील दुरावा अजूनही कायम असल्याचे दिसून आले. ‘जब वी मेट’ मधील तुमची केमेस्ट्री लोकांना खूप आवडली होती. तेव्हा तुम्ही दोघे ‘जब वी मेट’ च्या दुसऱ्या भागात काम करणार का, असे विचारण्यात आल्यानंतर जे घडलेच नाही त्याबाबत आम्ही समाधानी किंवा असमाधानी आहोत, असे तुम्हाला विचारायचे आहे का, असा प्रतिप्रश्न शाहिदने पत्रकारांना विचारला. यादरम्यान, करिनानेही मध्येच शाहिदचे बोलणे तोडत आम्हाला एकत्र बघायचे तर ‘जब वी मेट’ची डिव्हीडी बाजारात उपलब्ध आहे, असे सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. आम्ही ‘जब वी मेट’च्या दुसऱ्या भागात एकत्र दिसणार का, याचे उत्तर तुम्हाला इम्तियाज अलीच देऊ शकेल. मात्र, त्याला हा चित्रपट बनवायचा असताच तर तो त्याने कधीच बनवला असता. मात्र, इम्तियाजने झालेले सगळे विसरून पुढे जाणे श्रेयस्कर मानले असावे, असे सूचक विधान शाहिदने यावेळी केले. तत्पूर्वी या कार्यक्रमात विशेषत: शाहिद करिनापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होता. व्यासपीठावरही आलिया भट पूर्णवेळ या दोघांच्यामध्ये उभी होती. याशिवाय, करिना आणि शाहिद यांनी एकमेकांसोबत छायाचित्रे काढून घेतानाही आलियाला सोबत ठेवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा