छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असणाऱ्या रिअॅलिटी शोपैकी एक म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखले जाते. ‘बिग बॉस’च्या घरात होणारे स्पर्धकांचे वाद, रुसवे फुगवे, खेळ, टास्क यामुळे हा शो वादग्रस्त असला तरीही तितक्याच आवडीने घराघरात पाहिला जातो. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या विविध कलाकारांची नाव बिग बॉसचे स्पर्धक म्हणून घेतली जात आहे. त्यात आता बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानचा भाऊ फैजल खान याच्याही नावाची चर्चा आहे. मात्र नुकतंच त्याने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

आमिर खानचा भाऊ फैजल खान हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच त्याला बिग बॉसच्या १६ व्या पर्वात सहभागी होण्याबद्दल संपर्क करण्यात आला आहे. मात्र त्याने ही ऑफर नाकारली आहे. यात त्याने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय फैजल खानने या शोच्या प्रसारणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयातही खटला दाखल केला आहे. याद्वारे त्याने या शोच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
आणखी वाचा : “तिथे फक्त सेक्सबद्दल…” आमिर खानच्या भावाने बॉलिवूड कलाकारांवर ओढले ताशेरे

त्यानंतर आता एका मुलाखतीत त्याने बिग बॉसमध्ये न जाण्याच्या निर्णयावर मोकळेपणाने भाष्य केले आहे. यात त्याने त्याला याचा भाग का व्हायचे नाही, याबद्दल सांगितले आहे. ‘ई टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत फैजल खान म्हणाला, “जेव्हा घरातील लोकांना कैद्यासारखे वागवले जाते तेव्हा किती पैसे मिळतात याचा काहीही फरक पडत नाही.”

“बिग बॉस हा एक हाय प्रोफाईल आणि चांगले पैसे मिळणारा शो असला तरी मला त्या शो चा भाग होण्याची इच्छा नाही. बिग बॉसमध्ये प्रत्येकजण एकमेकांच्या विरोधात उभे असतात. ते भांडतात. वाद घालतात. त्यासोबत तुम्हाला टास्कही दिले जात आहेत. ते तुमच्यासोबत मानसिकरित्या खेळ खेळतात. मला त्यात अडकायचे नाही”, असे फैजल खानने म्हटले.

आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

“बिग बॉसद्वारे तुम्हाला पैसे मिळतात. पण देवाच्या कृपेने मला जास्त पैशांची गरज नाही. त्यामुळेच मी विचार केला की पिंजऱ्यात का राहायचं? तसेच तुरुंगात का राहणे कोणाला आवडते? प्रत्येकाला चांगले जीवन आवडते. तुरुंगात राहण्यात काहीही मजा नसते. मी एकदा आमिरच्या घरात कैद झालो आहे. त्यामुळे पुन्हा तुरुंगात जाण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला मोकळा श्वास घ्यायचा आहे. मला पाण्यासारखे वाहायचे आहे”, असे फैजल खान म्हणाला.

दरम्यान फैजल खानने ‘फॅक्ट्री’ या चित्रपटातून दिग्दर्शनातून पदार्पण केले. या चित्रपटात फैजलने मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री रोली रायनने त्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. ‘मेला’,‘चिनार’ ‘दास्तान’ या चित्रपटांमधील त्याची भूमिका चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. त्यासोबतच फैजलने ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटातही काम केले आहे. सध्या तो अनेक चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका साकारताना दिसत आहे.

Story img Loader