बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदावर किती प्रेम आहे हे सांगण्याची गरज नाही. बिग बी बऱ्याचदा तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. तसेच श्वेता वडिलांविषयी बोलताना देखील दिसते. गेल्या काही वर्षांपासून श्वेता ही तिच्या आई-वडिलांसोबत राहताना दिसत आहे. पण श्वेता तिथे का राहते असा प्रश्न मात्र अनेकांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवळपास २३ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी श्वेताचे लग्न निखिल नंदाशी लावून दिले होते. त्यानंतर श्वेता मुंबई सोडून दिल्लीत स्थायिक झाल्याचे अनेकांना वाटले होते. कारण निखिल नंदा हा बऱ्याच वेळा दिल्लीमध्ये कामानिमित्त जात असतो. पण जेव्हा मुले झाली तेव्हा श्वेता दोन्ही मुलांसोबत ‘जलसा’ बंगल्यामध्ये राहू लागली. श्वेताचे तिच्या सासरी पटत नसल्यामुळे ती बिग बींसोबत राहते अशा अफवा तेव्हा सुरु झाल्या होत्या. इतकच नाही तर श्वेता आणि निखिलमध्ये वाद होत असल्यामुळे ते एकत्र राहात नाहीत असे ही म्हटले जात होते.

श्वेता नंदा वडिलांकडे येऊन राहण्यामागे वेगळे असे कोणते कारण नाही. सध्या ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामुळे ती वडिलांसोबत राहण्याला प्राधान्य देत आहे. तिच्या वैवाहिक जीवनातही कोणते अडथळे नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. केवळ स्वत:च्या करिअरवर लक्ष देण्यासाठी ती आई-वडिलांसोबत राहत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why amitabh bachchan daughter shweta bachchan nanda lives with parents here is reason avb