प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अभी अभी.. तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…, हम रहे या ना रहे कल…, यासारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याच्या मृत्यूनंतर घटनास्थळाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. या प्रकरणामध्ये आता कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. केके लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गाणी गात होता. मात्र त्यानंतर अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली. शेवटच्या क्षणी केकेला नेमकं काय झालं? केकेच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणाही आढळल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल आणि कॉन्सर्टचे आयोजकांची चौकशी केली आहे. यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे.
“स्पॉटलाइट बंद करा, मला त्रास…” गायक ‘केके’ अखेरच्या क्षणी नेमकं काय म्हणाला होता?
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, केके हा कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रम असलेल्या सभागृहात अडीच हजारांची क्षमता होती. मात्र या कार्यक्रमाची माहिती मिळताच त्या ठिकाणी दुप्पट गर्दी जमा झाली. या ठिकाणी जवळपास ५ हजार लोक जमा झाले होते. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. काहींनी गेटची तोडफोडही केली होती. त्यामुळे काही बाऊन्सर्सनी फोम स्प्रेची फवारणी केली होती.
तर दुसरीकडे आयोजकांच्या माहितीनुसार, कार्यक्रमातील सभागृहात असे काहीही घडले नाही. केके ची तब्येत आधीच खराब झाली होती. त्यामुळे त्यांनी काही काळ ब्रेक घेतला होता. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा गाणे गाण्यास सुरुवात केली, असे त्यांचे म्हणणे आहे.
एबीपीने दिलेल्या माहितीनुसार, सभागृहातून जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या होत्या त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. तसेच या कार्यक्रमाचे आणखी काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातील व्हिडीओ केके हा प्रचंड अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. त्यासोबत तो फार घामाघूमही झाल्याचे पाहायला मिळत आहे.
“अभी अभी तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…”; ‘केके’च्या शेवटच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ व्हायरल
तर आणखी एका व्हिडीओत तो वारंवार त्याचा चेहरा पुसत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी तो एसी सुरु नसल्याची तक्रारही करत असल्याचे दिसत आहे. पण त्याचा त्रास वाढत गेला. त्यानंतर तो शो बंद करण्यात आला. पण थोड्यावेळाने त्याला बरं वाटत असल्याचे समजताच त्याने पुन्हा एकदा परफॉर्मन्स दिला.
केकेने एएआर रेहमानसोबतच्या ‘कल्लुरी साले’ आणि ‘हॅलो डॉक्टर’ या गाण्यांच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने गुलझार यांच्या माचिस चित्रपटामधील ‘छोड आऐ हम वो गलीया’ गाणं गायला. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. हम दिल दे चुके सनममधील ‘तडप तडप के..’ गाणंही त्याचंच आहे.