बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या बाळाची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांकावर अनेकांनी टीका केली. दरम्यान नुकतंच प्रियांका आणि निकने सरोगसीचा पर्याय का निवडला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नुकतंच याचं उत्तर समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड लाईफने दिलेल्या एका वृत्तानुसार, प्रियांकाला सध्या फर्टिलिटीबाबत कोणतीही समस्या नाही. पण आता तिचे वय ३९ आहे आणि त्यामुळे बाळ होणे ही गोष्ट तिच्यासाठी फार सोपी गोष्ट नाही. तसेच त्यांच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकामुळे ही गोष्ट अधिक कठीण झाली असती. त्यामुळे अशा परिस्थितीत या जोडप्याने सरोगसीचा मार्ग निवडला.

निक आणि प्रियांका यांनी एका एजन्सीच्या मदतीने या महिलेची भेट घेतली. ही या महिलेची पाचवी सरोगसी आहे. हे दोघेही तिला भेटले आणि त्यांना ती आवडली. त्यानंतर त्यांनी याबाबतचा निर्णय घेतला. दरम्यान प्रियांका आणि निकच्या बाळाचा जन्म एप्रिलमध्ये होणार होता, मात्र प्री-मॅच्युअर डिलीव्हरी झाली आहे.

प्रियांका चोप्राशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ २७ व्या आठवड्यात जन्माला आलं आहे. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेण्यात येणार आहे. ते बाळ निरोगी झाल्यानंतरच या मुलाला ते तिच्या घरी आणणार आहेत.

ताज हॉटेलमध्ये पत्नीसोबत डिनर करताना गोविंदाने केला होता आईला फोन, म्हणाला “मी दारु…”

दरम्यान प्रियांकाच्या सोशल मीडिया पोस्ट बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रेटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. केविन जोनस, जो जोनस, सोफी टर्नर, लारा दत्ता, शेफाली शाह, भूमि पेडणेकर यांच्यासह इतर अनेक कलाकारांनी प्रियांकाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केल्या आहेत. प्रियांका आणि निकचं हे पहिलंच अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झालेला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did priyanka chopra and nick jonas choose surrogacy to have their child nrp