‘माव्‍‌र्हल’ आणि ‘डीसी’ या दोन कंपन्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जातात. ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा ‘कॅप्टन माव्‍‌र्हल’ हा सुपरहिरोपट धुमधडाक्यात प्रदर्शित झाला आहे. ‘माव्‍‌र्हल’मधील सर्वात शक्तिशाली फीमेल सुपरहिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन माव्‍‌र्हलला चाहत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय तर दुसरीकडे आपल्या प्रतिस्पध्र्याला जोरदार टक्कर देण्यासाठी ‘डीसी युनिव्हर्स’नेदेखील कंबर कसली आहे. त्यांनी आपल्या ‘शेजॅम’नामक सुपरहिरोला मैदानात उतरवले असून सध्या ते त्याचा जोरदार प्रचार करत आहेत. या स्पर्धेतील गमतीशीर बाब म्हणजे आज कॅप्टन माव्‍‌र्हलविरोधात उभा असलेला ‘शेजॅम’ कधीकाळी कॅप्टन माव्‍‌र्हल याच नावाने ओळखला जात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१९४० साली ‘फॉसेट कॉमिक्स’ या कंपनीने ‘व्हिज कॉमिक्स’च्या माध्यमातून पहिल्यांदा ‘कॅप्टन माव्‍‌र्हल’ हा सुपरहिरो बाजारात आणला. बिली वॉटसन नावाचा एक लहान मुलगा ‘शेजॅम’ असे ओरडल्यावर एक सुपरहिरो बनतो. या सुपरहिरोचे नाव त्यांनी कॅप्टन माव्‍‌र्हल असे ठेवले होते. या लहानशा कथानकातून निर्माण झालेला कॅप्टन माव्‍‌र्हल अल्पावधीतच लोकप्रिय झाला. सुपरमॅनची नक्कल करून तयार करण्यात आलेल्या कॅप्टन माव्‍‌र्हलने पुढे सुपरमॅनलाच आव्हान देण्यास सुरुवात केली. परिणामी डीसी कंपनीला लाखो रुपयांचा तोटा होऊ लागला. यावर उपाय म्हणून डीसीने ‘फॉसेट कॉमिक्स’वर सुपरमॅनची अनधिकृत नक्कल केल्याचा आरोप लावला. या आरोपाविरोधात फॉसेटला कोर्टात कोणताही सबळ पुरावा सादर करता आला नाही.  त्यामुळे १९५० साली कॅप्टन माव्‍‌र्हल कॉमिक्स बंद केले गेले. आता या प्रकरणाने आणखी एक नवीन वळण घेतले.

‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’चे जनक स्टॅन ली यांनी कॅप्टन माव्‍‌र्हल याच नावाने पुन्हा एक नवीन सुपरहिरो बाजारात आणला.  डीसीने पुन्हा एकदा कायद्याचा आधार घेऊन स्टॅन लीला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या कंपनीचेच नाव ‘माव्‍‌र्हल’ असल्यामुळे डीसी त्यांना रोखू शकले नाहीत. यावर उपाय म्हणून डीसीने ‘फॉसेट कॉमिक्स’ कंपनी विकत घेतली. आणि आपल्या कॅप्टन माव्‍‌र्हलला माव्‍‌र्हलच्या कॅप्टन माव्‍‌र्हलसमोर उभे केले. परंतु यामुळे वाचक गोंधळले आणि त्यातून माव्‍‌र्हल कॉमिक्सचा जोरदार प्रचार होऊ लागला. त्यांची लोकप्रियता वाढू लागली आणि डीसीचे नुकसान वाढले. शेवटी त्यांनी आपल्या कॅप्टन माव्‍‌र्हलचे नाव बदलून ‘शेजॅम’ असे ठेवले. आता हा शेजॅम आणि कॅप्टन माव्‍‌र्हल असे दोन्ही सुपरहिरो एकमेकांसमोर आहेत.