‘हॅपी न्यू इयर’ची दिग्दर्शिका फराह खानने सही केलेल्या पोस्टरची चर्चा केवळ चाहत्यांमध्येच नाही तर या चित्रपटाच्या कलाकार आणि सहका-यांमध्येही आहे.
चित्रपटातील इतर कलाकार दीपिका पादुकोण, सोनू सूद, अभिषेक बच्चन, बूमन इराणी आणि विवान शाह यांनी सही केलेले चित्रपटाचे पोस्टर नुकतेच शाहरुखला  मिळाले आहे. त्यासाठी शाहरुखने ट्विटवरून सर्वांचे आभार मानले. सर्वांनी सही करून मला माझे ‘एचएनवाय’चे (हॅपी न्यू ईयर) पोस्टर देण्याकरिता धन्यवाद, असे त्याने ट्विट केले आहे.

त्यावर लगेचच फराह खाननेही आपल्याला आपले पोस्टर हवे असल्याचे ट्विट केले. आपला वाढदिवस लवकरच येत असून, सर्वांनी सही केलेले पोस्टर भेटीच्या स्वरुपात आपल्याला द्यावे, असेही तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विटर खूळ इतक्यावरचं थांबले नाही. तर त्यानंतर अभिषेक बच्चन आणि चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक विशाल ददलानीनेही आपल्याला सर्वांची सही असलेले पोस्टर हवे असल्याचे ट्विट केले.
आता या ट्विटर वेडेपणाला काय म्हणावं? बहुतेक ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाची टिम प्रेक्षकांचे लक्ष्य वेधण्यासाठी ही नवीन योजना करत आहे असे वाटते.

Story img Loader