नुकताच प्रदर्शित झालेला रोमॅण्टिक चित्रपट रांझणा पाहिल्यानंतर आपण त्या चित्रपटाचा भाग नसल्याबद्दल अमिताभने खेद व्यक्त केला आहे. हा चित्रपट पाहून मला आनंद झाला. चित्रपट क्षेत्रातील तरुण कलाकारांचे काम पाहून आपण त्यांच्यामध्ये नसल्याचे वाईट वाटत असून त्यांचा मत्सर वाटत असल्याचे अमिताभने ब्लॉगवर लिहिले आहे. सोनम कपूर आणि धनुष यांचा चित्रपटातील अभिनय तसेच यूपीमध्ये चित्रीत केलेली दृश्ये ही छान असल्याचे त्यानी ट्विट केले आहे. तसेच, अनुराग कश्यपने अद्याप प्रदर्शित न झालेले काही चित्रपट पाहण्यासाठी दिले असून ते लवकरच पहायचे असल्याचे अमिताभने सांगितले.
मागील आठवडयात प्रदर्शित झालेल्या रांझना चित्रपटास वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. मात्र, चित्रपटातील दक्षिणात्य अभिनेता धनुषचे काम नावाजले गेले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत २० कोटींच्यावर गल्ला जमवला आहे.

Story img Loader