‘बॉम्बे व्हेल्व्हेट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेता रणबीर कपूर सेटवर दारू पिऊन येत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मात्र, दारू पिऊन सेटवर येण्यासाठी रणबीरला अधिकृतरित्या परवानगी देण्यात आल्याची आश्चर्यजनक माहितीही आता पुढे येत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यपनेच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान तशी कबुली दिली आहे. मात्र, अनुरागने यामागील कारणही स्पष्ट केले आहे.
‘बॉम्बे व्हेल्व्हेट’मध्ये रणबीर आणि अनुष्का यांची अनेक भावोत्कट दृश्ये आहेत. पण काही केल्या ही दृश्ये चित्रीत करताना रणबीरकडून हवे तसे काम होत नव्हते. त्यामुळेच रणबीरने दारू पिऊन ही दृश्ये चित्रीत करावी, असा पर्याय सुचविण्यात आला. जेणेकरून, भावोत्कट प्रसंगाच्यावेळी कॅमेऱ्यासमोर रणबीरच्या चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यातील अश्रू खरे वाटावेत, असा दिग्दर्शकाचा प्रयत्न होता. हा एकंदर प्रकार पाहता बॉलीवूडचे नट भूमिकेत परफेक्शन आणण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा नेम नाही, हेच पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा