बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या दिनक्रमातील बहुतेक वेळ हा सध्या अभिनेता शाहरुखचे चित्रपट पाहण्यात खर्ची पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ पूर्ण दिवसभर शाहरुखचे चित्रपट पाहत आहे. सिद्धार्थ हा शाहरुखचा मोठा फॅन असला तरी दिवसभर शाहरुखचे चित्रपट पाहण्यामागचे खरे कारण आपल्या आगामी चित्रपटात शाहरुखप्रमाणेच सहजसुंदर रोमान्स करण्याची कला अवगत व्हावी यासाठी सिद्धार्थ शाहरुखचे चित्रपट पाहात आहे.

शाहरुखची बॉलीवूडमध्ये किंग ऑफ रोमान्स अशी ओळख आहे. रोमॅण्टीक सिन्स शाहरुख अगदी विनासायास करतो. त्यामुळे शाहरुखच्या चित्रपटांतून काही टीप्स मिळाव्यात या उद्देशाने सिद्धार्थ सध्या शाहरुखचे सर्व रोमॅण्टीक चित्रपट पाहत आहे. प्रेम कथेवर आधारलेल्या ‘कपूर अँड सन्स’ या आगाची चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांच्याही भूमिका असणार आहेत.

Story img Loader