बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या वादग्रस्त वक्तव्य आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. कंगना रणौतचा आज ३५ वा वाढदिवस. अनेकदा आपल्या अफेअर्समुळे चर्चेत आलेली कंगना रणौत अद्याप अविवाहित आहे. त्यामुळे ती लग्न कधी करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान कंगनानं स्वतःच्या लग्नाबाबत तर अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही पण लग्नासाठी नवरा कसा हवा याचा खुलासा मात्र तिने एका मुलाखतीत केला होता.

कंगना रणौतला सैन्याबाबत खूप आकर्षण आहे. त्यामुळे लग्नासाठी आर्मी ऑफिसरला तिची पसंती असणं सहाजिक आहे. कंगनानं एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. एक आदर्श जीवनसाथी म्हणून सैन्यातील अधिकारी मला आवडेल असं तिनं म्हटलं होतं. ही गोष्ट तिने तिच्या ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सांगितली होती. ज्याची बरीच चर्चा झाली होती.

आणखी वाचा- “या चित्रपटामुळे लोकांमध्ये तिरस्कार…” प्रकाश राज यांची ‘द कश्मीर फाइल्स’वर संतप्त प्रतिक्रिया

कंगनानं २०१७ साली ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जम्मूमध्ये बॉर्डर सेक्युरिटी फोर्सच्या हेडक्वार्टरला भेट दिली होती. या ठिकाणी बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी बोलताना कंगनानं, एक सैन्यातील अधिकारी हा तिच्यासाठी एक आदर्श जीवनसाथी असू शकतो असं म्हटलं होतं. एका जवानानं कंगनाला म्हटलं होतं की, मुली सैनिकांशी लग्न करत नाहीत. यावर कंगना हसत म्हणाली होती, ‘ती मुलगी नक्कीच मूर्ख असेल जी एका सैनिकाला नकार देईल. मला युनिफॉर्ममध्ये सैनिक खूपच आकर्षक वाटतात.’ तसेच मस्करीच्या सूरात कंगना म्हणाली होती की कदाचित एका सैनिकाच्या रुपातच तिला आदर्श जीवनसाथी मिळू शकतो.

आणखी वाचा- The Kashimr Files साठी अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्रींनी किती घेतलं मानधन? वाचा सविस्तर

दरम्यान कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अखेरची तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक ‘थलायवी’मध्ये दिसली होती. आगामी काळात तिच्याकडे ‘धाकड’ आणि ‘तेजस’ हे दोन अॅक्शनपट आहेत. ‘तेजस’मध्ये ती एका फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती ‘लॉक अप’ हा ओटीटी शो होस्ट करत आहे.

Story img Loader