बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही बोल्ड फोटोंसाठी विशेष ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ईशा नेहमी तिच्या सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच ईशाने बाल्कनीत उभं राहून एक टॉपलेस फोटो शेअर केला होता. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान नुकतंच ईशाने या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. जेव्हा एखादा अभिनेता शर्टलेस फोटो शेअर करतो त्यावेळी त्याला ट्रोल केले जात नाही. हा सरळ लिंगभेद आहे, असे ईशा गुप्ता म्हणाली.

ईशा गुप्ताने काही दिवसांपूर्वी केलेल्या टॉपलेस फोटोशूटवर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. यावर तिला प्रश्न विचारण्यात आला असता ती म्हणाली, “हा सरळ लिंगभेद आहे. अनेक अभिनेते त्यांचा शर्टलेस फोटो शेअर करतात. त्यावेळी त्यांना कोणी काहीही बोलत नाहीत. त्या फोटोवर काय मस्त बॉडी आहे, अशा कमेंट केल्या जातात,” असेही ईशा गुप्ता म्हणाली.

यासोबतच लैंगिक शोषणाबद्दल तिला विचारले असता ईशा म्हणाली, “ही लोकांची मानसिकता असून याला दोष दिला पाहिजे. जर एखाद्या स्त्रीचे कपडे पाहिल्यानंतर तुमच्या मनात लैंगिक शोषणाचा विचार येत असेल तर तो तुमचा दोष आहे.”

आणखी वाचा : चक्क बाल्कनीत उभं राहून अभिनेत्रीने केलं टॉपलेस फोटोशूट, सोशल मीडियावर चर्चेत

“मी आता इतकी मॅच्युअर झाली आहे की या सर्वांवर प्रतिक्रिया देणे सोडून दिले आहे. तुम्हीही काहीही केलात तरी लोक तुमच्यावर टीका करणं सोडत नाही. मला चांगलं आठवतंय, मी एक साडी नेसून एक फोटो टाकला होता. त्यावेळीही लोकांनी आज पूर्ण कपड्यात फोटो टाकलाय अशी कमेंट केली होती. जेव्हा मी मेकअप करुन फोटो पोस्ट केला होता, तेव्हा लोकांनी प्लास्टिक सर्जरी अशी कमेंट केली होती. तर दुसरीकडे मी मेकअपशिवाय फोटो पोस्ट केला होता, तेव्हा मला वेडी आहेस का? तुला मेकअप करण्याची गरज आहे, अशी कमेंट काही जणांनी केली होती. हे फक्त आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात होते,” असेही ईशा गुप्ताने सांगितले.

ईशा गुप्ताने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बाल्कनीत उभी असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.