अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन आता दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्यापही त्याच्या आत्महत्येमागील खरं कारणं स्पष्ट झालं नाही. सध्या या प्रकरणी तपास सुरु असून रोज नवनवीन माहिती समोर येत असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतची स्पिरिच्युअल हिलिंग (आध्यात्मिक पद्धतीने समुपदेशन) थेरपी केल्याचं ‘न्युज18’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नोव्हेंबर २०१९ मध्ये रियाने मोहन सदाशिव जोशी या समुपदेशकांच्या मदतीने सुशांतचं समुपदेशन केलं होतं. रियाने २३ आणि २४ नोव्हेंबर या दोन दिवशी मोहन जोशी यांच्याशी संपर्क साधून सुशांत नैराश्यात असल्याचं सांगितलं होतं. परंतु, मोहन जोशी यांनी केलेल्या समुपदेशनात सुशांत नैराश्यात नव्हता असं समोर आलं होतं. मोहन सदाशिव जोशी हे प्रसिद्ध समुपदेशक असून सध्याच्या काळात त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांच्या मित्राने त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं आहे.

सुशांत सिंहच्या वाढदिवसानिमित्त रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

“सुशांत नैराश्यात असल्याचं रियाने मोहन जोशी यांना सांगितलं होतं. त्यामुळे त्याचं समुपदेशन करावं असंही तिने सांगितलं होतं. त्यानंतर मोहन जोशी यांनी २३ आणि २४ नोव्हेंबर अशा दोन दिवशी सुशांतची भेट घेतली आणि त्याचं समुपदेशन केलं. या समुपदेशनात सुशांत नैराश्यात नसल्याचं समोर आलं होतं”, असं मोहन जोशी यांच्या मित्राने सांगितलं.

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने अभिनेत्याच्या जन्मदिनानिमित्त दाखवले त्याचे कधीही न पाहिलेले फोटो, म्हणाली…

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत असून तपासात अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. यापूर्वी सुशांतच्या घरात झालेली पुजा आणि आता आध्यात्मिक पद्धतीने समुपदेशन या नव्या गोष्टी समोर आल्या आहेत.