पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. सोमी अलीनं नुकतीच सलमानचं नाव न घेता सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिनं अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनलाही टॅग केलं आहे. या पोस्टमध्ये तिनं सलमान खानची तुलना हॉलिवूड दिग्दर्शक हार्वी वाइनस्टीनशी केली आहे. ज्याच्यावर ८० पेक्षा जास्त महिलांनी लैंगिक अत्याचारांचे आरोप केले होते. या पोस्टमध्ये सोमीनं अशाचप्रकारे बॉलिवूडचाही पर्दाफाश होईल असं म्हटल आहे. सोमीच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सोमी अलीनं वयाच्या १६ व्या वर्षी ‘मैंने प्यार किया’ चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट पाहिल्यावर ती सलमानच्या प्रेमात पडली होती. सलमानशी लग्न करण्याचं स्वप्न पाहून ती भारतात आली होती. पण त्यावेळी सलमान खान संगीता बिजलानीला डेट करत होता. दोघं लग्न करणार होते. पण त्याचवेळी सलमानच्या आयुष्यात सोमी अलीची एंट्री झाली. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना ८ वर्ष डेट केलं.

आणखी वाचा- The Kashmir Files बद्दल प्रश्न विचारल्यानं पत्रकारावर भडकला जॉन अब्राहम, म्हणाला…

सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर सोमी अली फ्लोरिडाला निघून गेली. तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता ती तिथेच स्थायिक झाली आहे. मागच्या वर्षी एका मुलाखतीत सोमीनं २० वर्षांपासून सलमानशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्याचं म्हटलं होतं. याशिवाय सलमाननं आपला विश्वासघात केल्यानं मी हे नातं संपवलं असंही तिनं या मुलाखतीत म्हटलं होतं.

आणखी वाचा- “माझ्यासाठी तुझ्या हृदयाचे…” सावत्र मुलगी समायरासाठी दिया मिर्झाची पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सलमाननं सोमी त्याच्या आयुष्यात आल्यानंतर संगीता बिजलानीशी ब्रेकअप केलं होतं. त्यानंतर संगीतानं क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न केलं होतं आणि मग २०१० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पण ज्या सोमी अलीसाठी सलमान खाननं संगीता बिजलानीला सोडलं होतं. त्या सोमी अलीला त्यानं ऐश्वर्या रायसाठी त्यानं सोमी अलीचा विश्वासघात केला असं बोललं जातं. १९९९ साली ‘हम दिल दे चुके सनम’ प्रदर्शित झाला आणि ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याच्या चर्चा होऊ लागल्या. पण नंतर काही वर्षांनी सलमान आणि ऐश्वर्याचंही ब्रेकअप झालं.