१४ एप्रिल रोजी समांथा रूथ प्रभूचा ‘शकुंतलम’ हा चित्रपटात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या बिग बजेट चित्रपटाकडे लागलं होतं. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाच्या फ्लॉप होण्याने समांथाचं करिअर संपल्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली.
आता मात्र साऊथची ही सुपरस्टार लेडी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. समांथाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समांथाने बुरखा परिधान केल्याचं दिसत आहे. समांथाने नेमका बुरखा का परिधान केला आहे यावरून तिचे चाहते सोशल मीडियावर चर्चा करत आहेत.
आणखी वाचा : ‘पुष्पा २’च्या आयटम साँगमध्ये समांथा ऐवजी कोण दिसणार? ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा
९ मे रोजी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा वाढदिवस होता, परंतु तो चित्रीकरणात व्यस्त असल्याने सेटवर विजयच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली होती. समांथा आणि विजय हे आगामी ‘कुशी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याच चित्रपटातील समांथाचा हा बुरखा घातलेला लूक या व्हिडीओमुळे व्हायरल होत आहे.
वाढदिवस विजय देवरकोंडाचा असला तरी या व्हायरल व्हिडीओमध्ये समांथा अन् तिच्या बुरख्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या टीमसह सगळ्यांनी विजयचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. या वेळी समांथाने विजयसाठी हॅपी बर्थडे हे गाणंही म्हंटलं. या दोघांच्याही चाहत्यांनी या व्हिडीओवर चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.