दिग्दर्शक करण जोहर #ShameOnKaranJohar या हॅशटॅगमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अनेकांनी करणवर नाराजी दर्शवली आहे. हा हॅशटॅग चर्चेत येण्याचं कारण म्हणजे  एका चाहत्यानं शाहरूखविरोधात केलेलं ट्विट करणनं अनावधानानं लाइक केलं. करणनं हे ट्विट लाइक केल्यानंतर अल्पावधित सोशल मीडियावर करणविरोधात वारे वाहू लागले.

ट्विटरवर एका चाहत्यानं शाहरूख खान विरोधात ट्विट केलं. या चाहत्यानं शाहरूख आणि अक्षयची तुलना होऊच शकत नाही असं लिहित शाहरूखला बी ग्रेड अभिनेता म्हटलं. हे ट्विट करणनं लाइक केलं. त्यानंतर करणविरोधात #ShameOnKaranJohar हा हॅशटॅश ट्रेंड होऊ लागला. शाहरूख आणि करणची घट्ट मैत्री आहे असं असताना करणनं  शाहरूखविरोधातील ट्विट लाइक केल्यानं अनेकांनी करणवर टीका केली आहे.

करणविरोधातील हॅशटॅग ट्रेंड होत असताना पाहून करणनं यावर स्पष्टिकरण दिलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे काहीतरी गडबड झाल्याचं करणनं म्हटलं आहे. लवकरच यावर मार्ग काढतो तोपर्यंत चुक झाली तर संभाळून घ्या असंही ट्विट त्यानं केलं आहे.

Story img Loader