नागराज मंजुळेचं नाव घेतलं की डोळ्यासमोर त्याचे वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट डोळ्यासमोर येतात. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ हे त्यांचे चारही चित्रपट तुफान गाजले. प्रेक्षकांनी या चित्रपटांना अक्षरशः डोक्यावर घेतले. लेखकी, दिग्दर्शक अभिनय अशा तिन्ही बाजू ते उत्तमरीत्या सांभाळतात. सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा होताना दिसून येत आहे यावर नागराज मंजुळेंनी भाष्य केलं आहे.
मुंबईतकला दिलेल्या मुलाखतीत दाक्षिणात्य चित्रपटांचा जेव्हा विषय आला तेव्हा ते असं म्हणाले, की “सध्या दाक्षिणात्य चित्रपट आपल्याकडे खूप गाजत आहेत. ‘पुष्पा’ असो किंवा’ बाहुबली’ असो हे आताचे नाही. ते लोक अनेक वर्ष त्यांचे चित्रपट आपल्याकडे डब करून पाठवत आहेत आणि ते आता यशस्वी झाले आहेत. मराठी चित्रपट डब करतच नव्हते. तुम्ही आता त्याचा विचार करायला लागला आहात डबिंगचा, अजून ते केलंदेखील नाही. आपल्याकडेदेखील नाना पाटेकर, सयाजी शिंदे असे उत्तम कलाकार आहेत. आपण त्यांना हे दाखवून दिले पाहिजे. त्या लोकांनी खूप आधी प्रयत्न केले म्हणून ते आता यशस्वी झाले आहेत. अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
‘झुंड’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटाची घोषणा केली. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यात नागराज मंजुळे यांचा लूक अगदी थक्क करणारा आहे. तसेच चित्रपटामधील इतर कलाकारांचे चेहरेही यामध्ये दिसत आहेत. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर पोलिस व गुन्हेगार यांच्याभोवती फिरणारी ही चित्रपटाची कथा आहे असं दिसून येत आहे. चाहत्यांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.