प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान झाले आहेत. रामभक्त ज्या ऐतिहासिक क्षणाची एवढी वर्षे वाट पाहत होते तो दिवस अखेर आज आला. या भव्य कार्यक्रमासाठी अयोध्यानगरी सजली आहे. या सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी, अनेक दिग्गज राजकारणी आणि सिनेसृष्टीतील कलाकार अयोध्येला पोहोचले व या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले. बॉलिवूडमधील बरेच कलाकार या कार्यक्रमासाठी मुंबईतून रवाना झाले आहेत. एकूणच साऱ्या देशभरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

रामायणावर बेतलेल्या वेगवेगळ्या कलाकृती आपल्यासमोर आजवर आलेल्या आहेत. नुकतंच गेल्यावर्षी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे निर्माण झालेला वाद तर आजही आपल्या लक्षात असेल, पण रामायणावर बेतलेल्या अशाच एका कलाकृतीवर भारतात बंदी घातली गेली होती हे तुम्हाला ठाऊक आहे का? भारतासह परदेशातही भरपुर रामभक्त आपल्याला पाहायला मिळतात. अशाच एका जपानच्या निर्मात्यांनी रामायणावर आधारित एक चित्रपट बनवला होता, परंतु या चित्रपटावर एकेकाळी बंदी घालण्यात आली होती.

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supriya Sule on GOd
Supriya Sule : नवरात्रीचे नऊ दिवस उपवास अन् पांडुरंगावर भाबडं प्रेम; सुप्रिया सुळे श्रद्धेविषयी काय म्हणाल्या?
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
subhash ghai reveals success secret
कलाकृतीत भारतीयत्व असेल तर ती दीर्घकाळ यशस्वी ठरते, दिग्दर्शक सुभाष घई यांनी उलगडले त्यांच्या यशामागचे इंगित
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Muramba
फिल्मी स्टाइलने अक्षयने रमाला केले प्रपोज; गोड नात्याची नव्याने होणार सुरुवात, ‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट

आणखी वाचा : राम मंदिरासाठी ‘हनुमान’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी; ट्विटर पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती

जपानी दिग्दर्शक युको सको १९८३ साली भारत दौऱ्यावर आले होते अन् त्याचवेळी त्यांना रामायणाबद्दल माहिती मिळाली. त्यांनी रामायणाची वेगवेगळी १० व्हर्जन्स वाचली व त्यांचा अभ्यास करून मगच त्यावर चित्रपट बनवायचा निर्णय त्यांनी घेतला अन् ‘रामायण-द लीजेंड ऑफ प्रिन्स रामा’ हा जपानी अॅनीमेटेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यावेळी विश्व हिंदू परषदेकडून या चित्रपटाला जबरदस्त विरोध झाला होता. देवाला कार्टून स्वरूपात सादर करण्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला होता.

या चित्रपटामुळे कोणत्याही भारतीयाची भावना दुखावली जाणार नाही असे आश्वासन अखेर खुद्द दिग्दर्शकाने दिल्यावर या चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी देण्यात आली. हा एक बिग बजेट चित्रपट होता. रामानंद सागर यांच्या रामायणात रामाची भूमिका निभावणाऱ्या अरुण गोविल यांनी ‘रामायण-द लीजेंड ऑफ प्रिन्स रामा’मधील प्रमुख भूमिकेला आवाज दिला होता. हा चित्रपट पूर्णपणे तयार झाला अन् त्याचदरम्यान बाबरी मशिदीवरुन देशभरात वाद पेटला अन् युको सको यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनात आणखी एक अडथळा निर्माण झाला.

आणखी वाचा : “कित्येक पिढ्यांनी…” राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याविषयी व्यक्त होताना अभिनेते मनोज जोशी भावुक

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहाय्याने नंतर हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यात आला. २०२२ मध्ये पंतप्रधानांनी युगो सको यांची भेट घेतली अन् त्यांच्या या चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगीही दिली. जपानी भाषेसह हा चित्रपट इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ‘आदिपुरुष’वर जबरदस्त टीका झाल्यानंतर या जपानी रामायणाचे बरेच संदर्भ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांत या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनाही हे रामायण प्रचंड आवडले आहे.